Prasad and Deepika Vedpathak Social Accounts Ban: प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांच्या चाहत्यांसाठी एक मोठा धक्का. प्रसिका म्हणून प्रसिद्धी मिळवणारे इन्फ्लुएंसर कपलचे सोशल मीडिया अकाऊंट सस्पेंड झाले आहे. सोशल मीडियातील त्यांचे सर्व प्रमुख अकाउंट्स अचानक सस्पेंड झाले आहेत. एकाच वेळी लाखो फॉलोअर्स असलेले इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि युट्युबवरील अकाउंट्स बंद झाले आहेत. सर्व सोशल चॅनेल्स बंद झाल्यानं चाहत्यांना निश्चितच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, त्यांचं सोशल मीडिया अकाउंट्स का सस्पेंड करण्यात आलं? या मागचं मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही.
प्रसाद आणि दीपिका ज्यांची ओळख प्रसिका म्हणूनही होती, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स सस्पेंड झाले आहेत. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 'नमस्कार मंडळी, सर्वांनी जेवायला या', असं म्हणत प्रसाद आपल्या व्हिडिओची सुरुवात करायचा. तर, दीपिका आपल्या कुकिंग्जचे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करायची. मात्र, त्याचं अकाउंट सस्पेंड झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
यासंदर्भात प्रसादनं त्याच्या अधिकृत अकाउंटवरुन व्हिडिओ पोस्ट करत याबाबत संपूर्ण माहिती दिली. व्हिडिओमध्ये प्रसाद म्हणतो, 'गेल्या 10 वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणे कंटेट तयार करतोय. आम्ही कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केलेलं नाही. सर्व गाईडलाईन्स फॉलो करुन सुद्धा आमचे सर्वे अकाउंट्स अचानक सस्पेंड करण्यात आले आहे. अकाउंट्स सस्पेंड करण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही', असं प्रसाद म्हणाला. दरम्यान, त्यानं संबंधित प्लॅटफॉर्म्सना या प्रकरणाची तातडीनं दखल घेण्याची विनंती केली.
"आमच्या सर्व अकाउंट्स व्हेरिफाइड होत्या. सध्या आमचे क्लायंट आणि ब्रँड्स वाट पाहत आहेत. ब्रँड्ससोबतचे आमचे प्रलंबित प्रोजेक्ट्स थांबले आहेत. अकाउंट्सचा एक्सेस नसल्यानं काम पूर्ण करता येत नाहीये", असंही प्रसादनं आपल्या व्हिडिओतून स्पष्ट केलं. दरम्यान, संबंधित सोशल प्लॅटफॉर्मकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. प्रसाद आणि दीपिकानं अकाउंट्स पुन्हा सुरू करण्यासाठी काही प्रक्रिया सुरू केली आहेत.
दरम्यान, प्रसिकाच्या चाहत्यांनी या कपलला पाठिंबा दिला आहे. दोघांचे सोशल मीडिया अकाउंट्स पुन्हा सुरू होणार का? याकडे प्रसिकाच्या फॅन्सचे लक्ष आहे.