Prarthana Behere: मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक  मालिका, चित्रपटामधून प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःची वेगळी जागा तयार केलीय. पण तुम्हाला माहितीय का की प्रार्थना मनरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी पत्रकार होती. या काळात तिने अनेकांना वादग्रस्त प्रश्न विचारले. यात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता.'आरपार' ला मुलखात देतना प्रार्थनाने याबद्दल संगीतलं आहे.

Continues below advertisement

अमिताभ बच्चन यांना विचारला वादग्रस्त प्रश्न 

प्रार्थना म्हणाली, "नि:शब्द सिनेमाची पत्रकार परिषद होती. दुनियाभरचे पत्रकार तिथे आले होते. सिनेमाची गोष्टच अशी होती की, ६० वर्षांचा माणूस १६ वर्षांच्या मुलीवर प्रेम करतो. तर अमिताजी खूप वेळा याबद्दल सांगत होते. पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तेव्हा मी हात वर केला. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि तेव्हा आपलं असतं ना, की मी जग जिंकणार. त्या वयात आपण अगदीच बिनधास्त असतो तशीच मी होते. मी मोठ्या उत्साहात हात वर केला आणि म्हटलं मला विचारायचाय प्रश्न.'

'लोक बोलते है की इंसान 60 साल के बाद सठिया जाता है, तो क्या इस फिल्म मे आपने सठिया जाने की वजह से 16 साल की लडकी के साथ प्यार किया?' हे मी त्या सिनेमाबद्दलच विचारत होते पण तेव्हा अमिताभ बच्चनही त्यावेळी  60 वर्षांचे झाले होते. त्यांच्या वाढदिवसालाच या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे खूप लोकांनी तो प्रश्न वैयक्तिक घेतला की, मी अमितजींनाच तसं बोलले. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, 'ते तुम्हाला सिनेमा पाहून समजेल'. या प्रश्नानंतर स्टार न्यूजच्या चॅनल हेडला माझा हा बिंधास्तपणा आवडला आणि त्यांनी मला नोकरी दिली. असं प्रर्थनाने सांगितलं. 'पवित्र रिश्ता' पासून 'माझी तुझी रेशीमगाठ' पर्यंत तिने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पण यश आणि प्रसिद्धीच्या या शिखरावर असताना प्रार्थना एका गोष्टीची उणीव भासत होती,वेळेची असही तिने सांगितलं.

Continues below advertisement