Actress Supports Pranit More: हिमांशू जांगडा या तरुणानं प्रणित मोरेच्या  शोमध्ये '370 रुपयांच्या बिर्याणी'चा किस्सा शेअर करुन मोठा गदारोळ निर्माण केला. प्रणित मोरेनं यावर अॅक्शन का घेतली नाही? यामुळे त्याला टीकेचं धनी व्हावं लागलं. राष्ट्रीय महिला आयोगापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांनी या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली. सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांनीही नाराजी व्यक्त केली. नेटकऱ्यांनीही प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार हिनं मृतदेहावर केलेल्या अश्लील टिपण्णीवर रोष व्यक्त केला. दरम्यान, या सगळ्या गदारोळात अभिनेत्री कुनिका सदानंद हिनं प्रणित मोरेला पाठिंबा दिला आहे. तिनं प्रणित मोरेच्या व्हिडीओवर कमेंट करत पाठिंबा दर्शवली.

Continues below advertisement

प्रणित मोरेनं व्हिडीओ शेअर करत माफीनामा जाहीर केला.  'माझ्याकडून चूक झाली. कायदेशीर कारवाईला मी सहकार्य करतो. मला एक संधी देण्यात यावी. मी एक चांगला माणूस नक्कीच बनून दाखवेन', असं त्यानं आपल्या व्हिडीओत म्हटलं होतं. व्हिडीओवर काहींनी त्याला ट्रोल केलं. तर, अभिनेत्रीनं व्हिडीओवर कमेंट करुन पाठराखण केली.   

प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रणित मोरेला पाठिंबा (Kunickaa Supports Pranit More)

प्रणित मोरेच्या व्हिडीओवर कुनिका सदानंदने कमेंट करुन म्हटलं की, 'चूका या प्रत्येकाकडून होतात.  पण त्या चूका स्वीकारण्याचं धाडस प्रत्येकाकडे नसतं. प्रणित तू एक चांगला मुलगा आहेस. तुझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. एन्टरटेनर म्हणून रोस्टिंग किंवा विनोद करताना वाहवत जाण्याची शक्यता असते. मला आशा आहे की, लोक तुला माफ करतील आणि स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल'.

Continues below advertisement

'ही मानसिकता केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. महिलांना वस्तू म्हणून पाहणाऱ्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जुन्या विचारसरणीचा प्रभाव समाजातील अनेकांवर आहे. त्याच जुनाट विचारसरणीचा वारसा लाभलेल्या अनेकांपैकी तू एक आहेस. गॉड ब्लेस यू.. मला आशा की,  तू उत्तम कंटेट घेऊन परत येशील.  Stay Strong', असं अभिनेत्रीनं प्रणित मोरेच्या पोस्टमध्ये म्हटलं. सध्या अभिनेत्रीची कमेंट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

370 बिर्याणीचा वाद नेमका आहे तरी काय? (370 Biryani Controversy)

हिमांशू जांग्रा या तरुणानं प्रणित मोरेच्या शोमध्ये तरुणीसोबत डेटवर गेल्याचा अनुभव शेअर केला होता.  'बिर्याणीवर 370 खर्च केले आता, वसूल तर करावे लागतील ना...', असं त्या तरुणानं म्हटलं होतं.  त्यानं केलेल्या वक्तव्यातून, संबंधित तरुणीकडून शारीरिक जवळीकची अपेक्षा असल्याचा आशय व्यक्त होत असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यानं केलेल्या विधानानंतर राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी रोष व्यक्त केलाय.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या आयुष्यात डबल आनंद, जुळ्या मुलांना दिला जन्म; बाळांची पहिली झलक शेअर, म्हणाली...