Pranit More Controversy: प्रणित मोरे आक्षेपार्ह कन्टेन्टमुळे पुन्हा तोंडावर पडला! सोशल मीडियावर मागितली माफी; 'तो' व्हिडीओही हटवला, नेमकं घडलं काय?
Pranit More Peak Gudgaon Content Controversy:हे ट्रोलिंग शेवटी एवढं वाढलं की, त्याला सोशल मीडियावर माफी मागावी लागली. त्याच्या माफीनाम्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

Praneet More Apology on Peak Gurgaon Content Comment: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारा स्टँड अप कॉमेडियन (Stand Up Comedian) आणि नुकताच 'बिग बॉस 19 ' शोमध्ये सहभागी झालेला प्रणित मोरे (Pranit More) पुन्हा एकदा त्याच्या कॉमेडी शोमधील एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. रविवारी त्याच्या एका लाईव्ह शोमधील एकाशी बोलत असताना व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग होत होतं. प्रेक्षकांमध्ये उपस्थित एका व्यक्तीच्या अत्यंत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्यावर प्रणित हसताना आणि त्याची खिल्ली उडवताना दिसला. त्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. हे ट्रोलिंग शेवटी एवढं वाढलं की, त्याला सोशल मीडियावर माफी मागावी लागली. त्याच्या माफीनाम्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
Pranit More: प्रणित मोरे कशामुळे झाला ट्रोल ?
प्रणित मोरेच्या अलीकडेच झालेल्या स्टँड अप कॉमेडी शोमध्ये तो प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका तरुणाशी त्याच्या डेटिंग अनुभवाविषयी बोलत असतो. या तरुणाने त्याचा डेटिंग अनुभव सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला ' तो एका मुलीसोबत बाहेर गेला होता. तिथे गेल्यानंतर मुलीच्या सांगण्यावरून त्याने तिला 360 ते 370 रुपयांची चिकन बिर्याणी खाऊ घातली. नंतर ती म्हणाली की, मला आता घरी सोड. त्यावर तो म्हणाला, 370 रुपयाची बिर्याणी खाऊ घातली आहे. आता ती मी वसूल करूनच थांबेन. ' तरुणाच्या या असं संवेदनशील वक्तव्यावर प्रणित मोरे हसत 'पीक गुडगाव कंटेंट ' असं म्हणताना दिसतोय.
डेटिंगचा अनुभव सांगणाऱ्या त्या मुलाने सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सोडल्या होत्या. अतिशय खासगी संबंधांविषयी तो असंवेदनशीलपणे बोलताना दिसला . पण त्याच्या बोलण्यावर उपस्थित अनेक तरुणांच्या टोळक्याने उभारून टाळ्या वगैरे वाजवल्या. प्रणित मोरे ही त्याचा सगळं बोलणं ऐकत होता. त्याला रोखण्याचा त्याने अजिबात प्रयत्न केला नाही. त्याने मुलीसोबत केलेल्या खासगी स्पर्शाविषयी सांगत असताना उपस्थित जमाव अक्षरशः चेकाळला होता.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रणित मोरेने हा व्हिडिओ डिलीट केला. मात्र अजूनही तो वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावर, youtube वर दिसतोय. या व्यक्तीला प्रणित मोरेने जवळपास अर्धा तास त्याचा एपिसोडमधील वेळ दिला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच इंटरनेटवर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. उर्फी जावेदने प्रणितचा हा व्हिडिओ शेअर करत 'पुन्हा एकदा पुरुष जातीने आपली औकात दाखवली, आणि सगळेजण त्यावर हसतायत. असं करून कूल वाटलं का ? घाणेरडा प्रकार ! ' अशी कमेंट तिने केली आहे.
Pranit More Appology:प्रणित मोरेने मागितली माफी
सोशल मीडियावर होणाऱ्या या सगळ्या प्रकारामुळे प्रणित मोरेला माफी मागावी लागली. Instagram वर स्टोरी पोस्ट करत तो म्हणाला," मी नुकत्याच व्हायरल झालेल्या crowdwork clip संदर्भातील टीका पाहिली आहे. त्या प्रेक्षकाने केलेली वक्तव्य माझ्या वैयक्तिक विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. मागे वळून पाहताना मला जाणवतं की, त्या वक्तव्याला हसून पुढे जाण्याऐवजी मला त्याला त्याच क्षणी विरोध करायला हवा होता. ती माझ्याकडून गेलेली चुकीची प्रतिक्रिया होती.
लाईव्ह crowdwork दरम्यान अनेक गोष्टींना लगेच प्रतिक्रिया द्यावी लागते, पण ते कोणतंही कारण ठरू शकत नाही. मला मिळालेला feedback मी गांभीर्याने घेतो आणि भविष्यात अशा परिस्थिती अधिक जबाबदारीने हाताळण्याचा प्रयत्न करेन. आम्ही तो व्हिडीओ आमच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे, कारण अशा विचारांना प्रोत्साहन किंवा नॉर्मलाईज करायचं नाही.
ज्यांनी शांतपणे आणि आदराने आपली नाराजी व्यक्त केली, त्यांचे मी आभार मानतो. जे काही घडलं त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो आणि यातून शिकण्याचा प्रयत्न करेन. मीही एक सामान्य माणूस आहे आणि सतत शिकत असतो. चूक झाल्यावर लोकांनी लक्ष वेधून दिलं तर त्यातून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते. भविष्यात नकळतपणेही अशा विचारांना समर्थन मिळणार नाही, याची अधिक काळजी घेईन. असं प्रणित म्हणाला.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















