Poonam Pandey on Pranit More Controversy: बिग बॉस 19चा (Bigg Boss) फायनलिस्ट प्रणित मोरे (Pranit More) आणि हिमांशू जांगडा (Himanshu Jangra) सध्या '370 बिर्याणी' प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्याच्या कॉमेडी शोमध्ये ऑडियन्स म्हणून बसलेल्या हिमांशू जांगडाने महिलेबद्दल अश्लील टिपण्णी केल्यामुळे हा वाद अधिक चिघळला. हिमांशू जांगडाने केलेल्या वक्तव्यामुळे कॉन्ट्रोवर्सी वाढत गेली. त्यानं एका महिलेला डेटवर नेल्याचा किस्सा सांगितलं. पण किस्सा सांगणं त्याच्याच अंगलट आलंय. 370 रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात, त्यानं तरुणीकडून काहीतरी परत मागितले होते. या प्रकरणानंतर दोघांवर टीकेचे पाऊस प़डला. आता या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींनी टीका करत प्रणित मोरे आणि हिमांशूला धारेवर धरलं. पूनम पांडे हिनं देखील या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.
प्रणित मोरेच्या शोवर पूनम पांडे बरसली (Poonam Pandey Slams Pranit More)
प्रणित मोरेच्या शोमधील अनेक क्लिप्स सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे हिमांशूसारख्या तरुणाला थांबवण्याऐवजी त्याच्यासोबत हसणाऱ्या या कॉमेडियनच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पूनम पांडे हिनं देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हिमांशूच्या मानसिकतेवरही नाराजी व्यक्त केली आहे. पूनम पांडेनं व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
370 रुपयाच्या बिर्याणी प्रकरणावर पूनम पांडे म्हणते, 'भाऊ, नेमकं चाललंय काय? मी 370 रुपयांच्या बिर्याणी प्रकरणाची स्टोरी ऐकली. वाह, काय विचार आहेत तुमचे. तसं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. आम्हा महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. या कारणास्तव आम्ही पॅड वापरतो. आमचे पीरियड पॅड्ससुद्धा 370 रुपयांच्या बिर्याणीपेक्षा जास्त महाग असतात. जे वापरल्यानंतर आम्ही फेकून देतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या शब्दांवर लक्ष ठेवा, कारण तुम्ही महिलांबद्दल बोलत आहात'.
डॉ. सेजल पवार आपल्या विनोदामुळे ट्रोल
सध्या पूनम पांडे हिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच प्रणित मोरेवरही संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सेजल पवार नावाची मुलगीही सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्या तरुणीनं मृतदेहाबद्दल अश्लील टिपण्णी केली होती. शोवर आलेल्या तरुणीने सांगितलं की, 'डॉक्टर म्हणून माझं काम डेड बॉडीचं डिसेक्शन म्हणजे, त्यांच्या अवयवांची तपासणी करणे आहे. यात मी पूर्ण एक वर्ष काम केलंय. माझ्यासोबत 10 मुलींचा ग्रुप होता. जे डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्ट्सवर जोक करायचे', असं सेजलने शेअर केलं. दरम्यान, सोशल मीडियावर डॉ. सेजल पवारला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तर, हिमांशू जांगडाला जॉबमधून काढून टाकलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
