Pranit More Controversy:प्रणित मोरेच्या शोमध्ये बरळला; '370 ची बिर्याणी' वक्तव्यानंतर 'त्या' प्रेक्षकाला नोकरीवरून काढलं; बॉसचा video व्हायरल
Pranit More Controversy: मागील रविवारी झालेल्या प्रणित मोरेच्या स्टँड अप कॉमेडी शोनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती.

Pranit More Biryani Statement Viral: काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या (Pranit More) शोमध्ये एका प्रेक्षकाची क्लिप व्हायरल झालेली. त्याच्या खळबळजनक वक्तव्यामुळे ही क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी फिरली. या क्लिपसह प्रणित मोरेच्या वक्तव्यावरही प्रचंड टीका होऊ लागली. ट्रोलिंग पाहून प्रणित मोरेला माफी मागावी लागली. या क्लिपमध्ये '370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली आहे, आता ती वसूल करणार' असं म्हणत महिलेसोबत शारीरिक जवळीक निर्माण करण्यासाठी भाग पाडणाऱ्या 'हेमंत जांगडा'ला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. त्याच्या बॉसने एक व्हिडिओ करत या संदर्भातील माहिती दिली.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मागील रविवारी झालेल्या प्रणित मोरेच्या स्टँड अप कॉमेडी शोनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. प्रणित मोरेला शेवटी तो व्हिडिओही डिलीट करावा लागला होता.
'370ची बिर्याणी ' वक्तव्य भोवलं ; तरुणाला नोकरीवरून काढलं
गेल्या आठवड्यात प्रणित मोरेच्या शोमधील एका क्लिपची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली. बिर्याणी वाद निर्माण होण्यापूर्वी हिमांशू जांगडा कुणाला माहीत असण्याचा कारण नाही. मात्र, या सगळ्या बिर्याणी वक्तव्य प्रकारानंतर असमवेदनशील वक्तव्यामुळे ट्रोल झालेल्या या प्रेक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. या संदर्भात त्या तरुणाच्या बॉसने व्हिडिओ करत माहिती दिली. या व्हिडिओनंतर ज्या कंपनीत तो काम करायचा, त्या कंपनीच्या बॉसला ऑफिसमधील अनेकांचे कॉल आले. ई-मेलही आले. त्यानंतर कंपनीतील कर्मचारी, त्यांचे क्लायंट यांना फरक पडत असल्याचं लक्षात आल्यानंतर इतकं असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या तरुणाला कामावरून काढून टाकण्यात आलं.
बॉसने व्हिडिओ करत सांगितलं..
प्रणित मोरेच्या शोमध्ये सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडणाऱ्या हेमंत जांगडाला नोकरीवरून काढल्याचं सांगताना त्याचा बॉस म्हणाला ' गेल्या 24 तासात मला आमचा कर्मचारी ही मांसू जांगडा याचा संदर्भात शेकडून मेसेज ई-मेल्स आणि फोन कॉल्स आले.तुमच्यापैकी अनेक प्रमाणे ऑनलाईन व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप्स माझ्या निदर्शनास आले आहेत.मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की या क्लिप्समधील विधाने अत्यंत आक्षेपार्ह आहेत. मी त्या विधानांची सहमत नाही.ही विधाने आमच्या कंपनीच्या मूल्यांशी सुसंगत नाहीत.त्यांचा तरुण मनावर प्रभाव पडू नये ' असं विवेक विश्वकर्मा म्हणाले.
हिमांशू जांगडा हा तरुण 'स्टारविक डिझाईन'या कंपनीत कार्यरत होता. हा वाद वाढल्यानंतर कंपनीचे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांनी हिमांशूला काढून टाकल्याची माहिती दिली.
ते पुढे म्हणाले ' आम्ही या प्रकरणाचा अंतर्गत आढावा घेतला.आमच्या टीमशी चर्चा केली. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.कामाच्या ठिकाणी हिमांशूचा वर्तणुकीची संदर्भात माहिती घेतली.विशेष म्हणजे आमच्या टीम कडून त्याच्या विरोधात एकही तक्रार आम्हाला आढळलेली नाही.संपूर्ण टीमने हिमांशूचं वर्तन हे व्यवसायिक,आदर पूर्ण आणि मेहनती असल्याचं सांगण्यात आलं. कामाच्या बाहेर घडलेल्या गोष्टींचा आता कामाच्या ठिकाणावरही परिणाम होतोय.कंपनी आमची टीम आमचे ग्राहक व आम्ही इथे निर्माण केलेलं वातावरण याबाबतीत माझी जबाबदारी आहे.म्हणून आम्ही हिमांशू पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय.'असं त्यांनी सांगितलं.
View this post on Instagram
काय बोलला होता हिमांशू जांगडा?
प्रणित मोरेच्या अलीकडेच झालेल्या स्टँड अप कॉमेडी शोमध्ये तो प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका तरुणाशी त्याच्या डेटिंग अनुभवाविषयी बोलत असतो. या तरुणाने त्याचा डेटिंग अनुभव सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला ' तो एका मुलीसोबत बाहेर गेला होता. तिथे गेल्यानंतर मुलीच्या सांगण्यावरून त्याने तिला 360 ते 370 रुपयांची चिकन बिर्याणी खाऊ घातली. नंतर ती म्हणाली की, मला आता घरी सोड. त्यावर तो म्हणाला, 370 रुपयाची बिर्याणी खाऊ घातली आहे. आता ती मी वसूल करूनच थांबेन. ' तरुणाच्या या असं संवेदनशील वक्तव्यावर प्रणित मोरे हसत 'पीक गुडगाव कंटेंट ' असं म्हणताना दिसतोय.
डेटिंगचा अनुभव सांगणाऱ्या त्या मुलाने सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सोडल्या होत्या. अतिशय खासगी संबंधांविषयी तो असंवेदनशीलपणे बोलताना दिसला . पण त्याच्या बोलण्यावर उपस्थित अनेक तरुणांच्या टोळक्याने उभारून टाळ्या वगैरे वाजवल्या. प्रणित मोरे ही त्याचा सगळं बोलणं ऐकत होता. त्याला रोखण्याचा त्याने अजिबात प्रयत्न केला नाही. त्याने मुलीसोबत केलेल्या खासगी स्पर्शाविषयी सांगत असताना उपस्थित जमाव अक्षरशः चेकाळला होता.






















