Pranit More Comeback After Controversy: स्टँड-अप कॉमेडियन (Stand Up Comedian), बिग बॉस (Bigg Boss) फेम प्रणित मोरे (Pranit More) याचे क्राऊड वर्क शो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कार्यक्रमाला आलेल्या एका तरुणानं बिर्याणीवरुन सांगितलेला किस्सा गाजला आणि यामुळेच प्रणित मोरे टीकेचा धनी झाला. एवढा की, त्याला थेट एक निवेदन जाहीर करुन माफी मागावी लागली. ट्रोलिंग एवढं वाढलं की, प्रणित मोरेला त्याचं इन्स्टा अकाउंट डिअॅक्टिव्हेट करावं लागलं. पण, '370 रुपयांची बिर्याणी'चा (Biryani Worth 370 Rupees) वाद पेटलेला असतानाच, प्रणित मोरेच्या शोमधलाच आणखी एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडिओमध्ये डॉक्टर आणि इन्फ्लुएन्सर सेजल पवार (Doctor And Influencer Sejal Pawar) हिनं केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर प्रणित मोरे आणि त्याच्या शोमध्ये आक्षेपार्ह्य वक्तव्य करणाऱ्या दोघांच्या अडचणी वाढल्या आणि थेट पोलिसांकडून त्यांची चौकशी होईपर्यंत प्रकरण पोहोचलं. अशातच आता हा वाद क्षमल्यानंतर प्रणित मोरे पुन्हा एकदा नव्या दमानं कमबॅक करण्यासाठी तयार आहे. 

Continues below advertisement

प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे यानं त्याच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवरुन पोस्ट केली आहे. त्यानं या पोस्टमधून कमबॅक करत असल्याचं जाहीर केलंय. तसेच, त्यानं यासोबतच एक कॅप्शन लिहिलंय, ज्यामध्ये त्यानं म्हटलंय की, जे झालं ते मी बदलू शकत नाही. पण, स्वतःला पुन्हा कसं घडवायचं हे माझ्या हातात आहे... तसेच, पुढे त्यानं आपल्या शोचं नावंही सांगितलंय. मुंबईतून प्रणित मोरेच्या नव्या शोची सुरुवात होत आहे.  

प्रणित मोरेची इन्स्टा पोस्ट (Pranit More Instagram Post)

Continues below advertisement

कॉमेडी शोमधल्या संभाषणावरुन मोठा गोंधळ झाला आणि प्रणित मोरे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला. अशातच आता 370 रुपयांची बिर्याणी आणि मृतदेहाच्या लैंगिक अवयवांरवर करण्यात आलेलं आक्षेपार्ह्य वक्तव्याचा वाद क्षमल्यानंतर प्रणित मोरे पुन्हा एकदा चाहत्यांसमोर कमबॅक करणार आहे. प्रणित मोरेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कमबॅक करणार असल्याचं जाहीर केलंय. प्रणित मोरे कमबॅक करताना चाहत्यांसाठी एक नवा शो घेऊन येत आहे, ज्याला त्यानं 'घायल' असं नाव दिलंय. 

प्रणित मोरेनं इन्स्टाग्रामवर नव्या शोचं पोस्टरही लॉन्च केलंय आणि त्यासोबत लिहिलंय की, "जे झालं ते मी बदलू शकत नाही. पण, स्वतःला पुन्हा कसं घडवायचं हे माझ्या हातात आहे. 'घायल' ही त्याच्या प्रवासाची कथा आहे. मुंबईत याची सुरुवात होतेय..."

दरम्यान, प्रणित मोरेनं इन्स्टा पोस्ट करताच त्याच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दर्शवलाय. तर, अनेकांनी त्याचं कौतुक केलंय. तसेच, पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात. प्रणितला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश आहे. पण, काहींनी प्रणितला ट्रोलही केलंय. 'आता हा इमोशनल कार्ड खेळतोय...', असं प्रणित मोरेच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड