Prajakta Shukre On Dating Rumors With Rahul Vaidya: प्राजक्ता शुक्रे (Prajakta Shukre) 'इंडियन आयडल'च्या (Indian Idol) पहिल्या पर्वात सहभागी झालेली. प्राजक्तानं हा शो जिंकला नाही, पण तिनं आपल्या गोड आवाजानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. आता नुकतीच प्राजक्ता 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 6) सहाव्या सीझनमध्ये झळकलेली. 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) घरात प्राजक्ता शुक्रे (Singer Prajakta Shukre) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे (Social Media Influencer Karan Sonawane) या दोघांची मैत्री चर्चेचा विषय ठरलेली. ज्यावेळी करण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला, त्यावेळी प्राजक्ता फार रडलेली. पण, यापूर्वी 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वावेळी प्राजक्ताचं नाव प्रसिद्ध गायक आणि 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वाचा फायनलिस्ट राहुल वैद्य (Singer Rahul Vaidya) याच्यासोबत जोडलं गेलं होतं. दोघांच्या रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा रंगलेल्या. दोघेही खरंच रिलेशनशिपमध्ये होते? सत्य नेमकं काय? यावर आता प्राजक्ता शुक्रेनं मौन सोडलं आहे. 

Continues below advertisement

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये झळकलेली सुप्रसिद्ध गायिका प्राजक्ता शुक्रे नुकतीच सिद्धार्थ कन्नन याच्या पॉडकास्टमध्ये आलेली. त्यावेळी तिनं 'इंडियन आयडल 1'मधल्या अनेक गोष्टींवर भाष्य केलंय. याच मुलाखतीत प्राजक्ता शुक्रे हिला तिचं आणि राहुल वैद्यचं एकमेकांवर प्रेम होतं का? असं विचारण्यात आलेलं. खरंच दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलेलं का? मग, दोघे एकमेकांपासून कसे आणि का वेगळे झाले? असे प्रश्न विचारण्यात आलेले. यावर प्राजक्ता शुक्रे हिनं उत्तरं दिलीत. 

सुप्रसिद्ध गायिका प्राजक्ता शुक्रे म्हणाली की, "त्या वयात जर कोण आपल्याला महत्व देत असेल, तर चांगलं वाटतं. तो मला चांगला वाटायचा आणि ते वय तसं होतं. तो जर बोलायला लागला तर खूप बोलतो. पण, आम्ही खूप लहान होतो आणि दोघांनाही अक्कल नव्हती. आम्ही काहीच ठरवलं नव्हतं..."

Continues below advertisement

"तो म्हणालेला, तू मला खूप आवडतेस..." : प्राजक्ता शुक्रे

राहुल वैद्यनं तुला प्रपोज केलेलं का? पॉडकास्टमध्ये असं विचारल्यावर प्राजक्ता शुक्रे म्हणाली की, "मी काहीच सांगणार नाही... फक्त तो एवढंच म्हणालेला, "तू खूप चांगली आहेस आणि मला खूप आवडतेस... आता मी इथेच थांबतो..." त्यावर मी त्याला म्हणालेले, "तूसुद्धा माणूस म्हणून खूप चांगला आहेस आणि उत्तम गायक आहेस..." आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो असं नाही म्हणणार... पण, त्यावेळी आम्ही एकत्र काम करत होतो..."

पुढे बोलताना प्राजक्ता शुक्रे हिनं सांगितलं की, "तो एका वेडिंग शोमध्ये जायचा... पण, मी तसे शो नाही करायचे. एकदा आम्ही एका वेडिंग शोमध्ये गेलेलो. पण, कुणाचं लक्ष नव्हतं... त्यावेळी माझं असं झालं, जर कुणाला ऐकायचंच नाहीये तर बोलावलं का? त्याचा माझ्या बालमनावर खूप खोलवर परिणाम झाला... एकमेकांपासून लांब जाण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता... त्यावेळी मीसुद्धा मोठी होत होते, त्यानंतर मला जाणवलं की, आमच्यात खूपच फरक आहे..."