Prajakta Mali Cannes Look VIDEO: यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) मराठी मनोरंजनविश्वाच्या (Marathi Entertainment World) शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर (Cannes Red Carpet) मराठमोळ्या सेलिब्रिटींनी दिमाखदार एन्ट्री घेतली. मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf), अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf), अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali), सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर आपला डेब्यू केला. मराठमोळ्या सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर आपला खास मराठमोळा अंदाज दाखवला. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या लूकवर साऱ्यांच्याच नजरा खिळल्यात. प्राजक्तानं तिच्या कान्स डेब्यूचा व्हिडीओ स्वतःच्या इन्स्टा हँडलवरुन शेअर केला असून त्यासोबत तिनं लक्ष वेधून घेणारं कॅप्शनही लिहिलंय. 

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेत कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या घ्ये (Cannes Film Festival) रेड कार्पेटवर दमदार पदार्पण केलं आहे. ग्लॅमर, फॅशन आणि जागतिक सिनेसृष्टीचा संगम मानल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित सोहळ्यात प्राजक्ताच्या उपस्थितीनं मराठी चाहत्यांचा अभिमान वाढवला आहे. त्यासोबतच या सोहळ्यातल्या तिच्या खास लूकची आणि रेड कार्पेटवरच्या तिच्या कॉन्फिडन्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली, चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.  

प्राजक्ताची नऊवारी साडी अन् पारंपरिक साज (Prajakta Mali Cannes Look)

प्राजक्तानं केलेल्या साज-श्रृंगाराची चर्चा कान्सच्या रेड कार्पेटवरही रंगलेली. प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रावरुन कान्स फिल्म फेस्टिव्हलचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता माळी नऊवारी साजात दिसतेय. त्यासोबतच तिनं पारंपरिक दागिने वेअर केलेत. प्राजक्ताच्या नऊवारी लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्यात. नऊवारी साडी आणि त्यासोबत पारंपरिक दागिन्यांचा साज, यामध्ये प्राजक्ताचं सौंदुर्य आणखी खुलून दिसतंय. मराठमोळा लूक केलेली प्राजक्ता रेड कार्पेटवर रॅम्प वॉक करताना दिसत आहे. प्राजक्ताच्या संपूर्ण लूकमध्ये जर सर्वांच्या नजरा कशावर खिळल्या असतील, त्या तिच्या पदरावर... प्राजक्तानं ज्या पद्धतीनं तिच्या नऊवारीचा पदर फ्लॉन्ट केला, साऱ्या परदेशी फोटोग्राफर्सच्या नजरा तिच्यावर खिळल्यात. यालाच म्हणतात अस्खलित मराठमोळं सौंदर्य, असं म्हणत प्राजक्ताच्या व्हिडीओवर युजर्स कमेंट करत आहेत. 

प्राजक्ता माळीच्या 'कान्स'मधल्या रेड कार्पेटचा VIDEO

प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाली? 

प्राजक्ता माळीनं 'कान्स' फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केला. ती पारंपरिक लूकमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली. आपल्या कान्स डेब्यूचा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता माळीनं एक कॅप्शन लिहिलंय. प्राजक्तानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "The world famous “Red Carpet of Cannes Film Festival... कान च्या रेड कार्पेटवर अस्सल पारंपरिक नथ- नऊवार नेसून चालण्याचा, जगाला मराठी ठसका दाखवल्याचा आनंद अवर्णनीय आहे... आणि अशा प्रकारे मराठीने “Main Red Carpet of Cannes Film Festival” मध्ये Debut केला... (या आधी जे मराठी कलाकार कान्सला गेले ते हिंदी-हिंग्लीश चित्रपट किंवा वेगळ्या रेड कार्पेटवर चालले. {तिथे 4-5 वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये फिल्म्स चालू असतात.} आम्ही मराठी कलाकार - मराठी भाषेच्या प्रसारार्थ चाललो; ह्याचा अत्यानंद..."

जागतिक मंचावर प्राजक्ताचा हा अत्यंत स्टायलिश लूक पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच, प्राजक्ताचं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर झळकणं महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, अशा कमेंट्सही अनेकांनी केल्या आहेत. 

मराठी भाषेला मिळालेल्या 'अभिजात दर्जा'च्या पार्श्वभूमीवर, कान्स फेस्टिव्हलमध्ये 'भारत पॅव्हेलियन' अंतर्गत एका विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या जागतिक मंचावर 'अभिजात मराठी'चं ग्लोबल लाँचिंग करण्यासाठी प्राजक्ता माळी तिथे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिली आहे. प्राजक्ता माळीसोबतच कान्समध्ये मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरसुद्धा रेड कार्पेटवर उतरलेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Cannes 2026 Ashok Saraf Nivedita Saraf Red Carpet Look: कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ, निवेदिता सराफ यांनी जपलं मराठीपण; 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष, VIDEO