Prajakta Mali Angry On Her AI Generated Photo: मराठी मनोरंजन (Marathi Entertainment Industry) विश्वातली लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री (Marathi Actress) प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगणा आहे. यासोबतच ती एक कवयित्री, उद्योजिका म्हणून नावारुपाला आली आहे. यासोबतच सौंदर्याची खाण असलेली प्राजक्ता महाराष्ट्रभरातल्या असंख्य मुलांच्या गळ्यातील ताईत आहे. तर, अनेक तरुणींची स्टाईल आयकॉन आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असते. तसेच, तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती स्वतः सुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बऱ्याचदा ती वेगवेगळ्या ब्रँडसाठी सुद्धा फोटोशूट करते. पण, आता स्वतःचाच फोटो पाहून प्राजक्ता माळी चिडली आहे. 

Continues below advertisement

स्वतःच्याच फोटोवर का चिडली प्राजक्ता माळी? 

मराठी मनोरंजन विश्वातली 'फुलवंती' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ता माळीनं नुकतीच सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केलेली. ज्यामध्ये तिनं स्वतःच्याच फोटोवरुन तिच्याच फॅन पेजवर राग व्यक्त केलेला. लहान-थोरांकडून आपण नेहमी ऐकतो की, हे कलियुग आहे. पण, आता असं म्हणावं लागतंय, सध्याचं युग हे AI चं युग आहे. अनेकदा AI जनरेटेड फोटोंमुळे डोक्याला ताप होतो. खऱ्या फोटोंमध्ये बदल करुन एक भलताच फोटो तयार केला जातो आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला जातो. असे अनेक  AI जनरेटेड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा असे फोटो दिशाभूल करतात. नेमक्या अशाच एका फोटोमुळे प्राजक्ता माळीची चिडचिड झालीय. 

प्राजक्ता माळीचा एसाच एक AI जनरेटेड फोटो तिच्याच फॅन पेजनं बनवलेला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो पाहताच प्राजक्ता माळी संतापली आणि तिनं तिच्या ऑफिशिअल अकाउंटवर एक स्टोरी टाकून संताप व्यक्त केलाय. तसेच, प्राजक्तानं चाहत्यांना आणि फॅन पेजेसना एक कळकळीची विनंतीही केली आहे. 

Continues below advertisement

प्राजक्तानं स्टोरीवर काय लिहिलेलं? 

प्राजक्ता माळीनं आपल्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिलंय की, हा फोटो दिसायला कितीही सुंदर असला तरी मी या फोटोचं अजिबातच कौतुक करणार नाही. मी AI नं तयार केलेल्या फोटो आणि व्हिडीओंना अजिबात प्रोत्साहन देणार नाही. मी माझ्या फॅन पेजेसना तसेच इतरांनाही विनंती करते की, हे असं बनवणं थांबवा... सोबतच प्राजक्तानं तिचा AI द्वारे तयार केलेला फोटो शेअर केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Girija Oak Blue Saree: ज्या ब्ल्यू साडीमुळे गिरीजा ओक रातोंरात नॅशनल क्रश बनली, 'ती' साडी दुसऱ्या एका मराठी अभिनेत्रीनं तिला दिलेली, नेमकं काय घडलेलं?