Prajkta Gaikwad Love Story Shambhuraj Khutwad: 'स्वराज्य रक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) मालिकेत महाराणी येसुबाईंची (Maharani Yesubai) भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Marathi Actress Prajkta Gaikwad). तेव्हापासून ती अवघ्या महाराष्ट्रात छत्रपतींची युवराज्ञी म्हणूनच ओळखली जाऊ लागली. सध्या प्राजक्ता तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.  प्राजक्ता गायकवाड हिचा नुकताच साखरपुडा पार पडला. आता लवकरच प्राजक्ता लग्नबंधनात अडकणार आहे. प्राजक्ता शंभुराज खुटवडे याच्यासोबत आपली लग्नगाठ बांधणार आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना प्राजक्तानं आपली हटके आणि फिल्मी लव्हस्टोरी सांगितली. तसेच, तिचा होणारा जोडीदार नेमका कोण? ती त्याला कुठे भेटली? याचाही खुलासा तिनं केला आहे. 

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्राजक्ता गायकवाड म्हणाली की, "माझ्या वयाच्या 18 व्या वर्षानंतर मला वेगवेगळे स्थळ यायला सुरुवात झाली होती. महाराणी येसूबाई महाराष्ट्रात पोहचली होती. पण मला डिग्री पुर्ण करायची होती. त्यानंतर मी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता." 

"शंभुराजची भेट खुप खास होती. मी एका सिनेमाचं शुटिंग करत होते. माझी नाईट शिफ्ट होती. तेव्हा अचानक माझ्या गाडीसमोर एक ट्रक आला आणि धडकला. तेव्हा मी खूप घाबरले होते. मी तेव्हा चिडून विचारलं, जो कोणी ओनर आहे, त्यांना बोलवा. ते खरंच खूप फिल्मी होतं... तेव्हा ड्रायव्हर थोडा विचित्र बोलू लागला. पण, तेव्हा तो तिथं आला आणि त्यानं सगळं सांभाळून घेतलं... पण शंभुराजनं मला कधीच ताई म्हणून हाक मारली नाही... मी त्याला दादा म्हणायचे, पण तो मला मॅडमच म्हणायचा...", असं प्राजक्या गायकवाड म्हणाली.   

प्राजक्ता आणि शंभुराज यांची भेट कुठे झाली?

प्राजक्तानं सांगितलं की, तिची शंभुराजसोबतची भेट अपघातानं झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री वाढली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सुरुवातीला प्राजक्तानं शंभुराजसोबत लग्न करायला नकार दिलेला. पण, नंतर शंभुराजनं तिचं मन जिंकलं आणि प्राजक्तानं अखेर त्याला होकार दिला. आता लवकरच दोघेही आपल्या लग्नगाठ बांधणार असून नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाड हिच्या आयुष्यात 'शंभूराज'ची एन्ट्री, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो