Pradeep Kabra Explores Srilanka: 'वान्टेड' (Wanted), 'दिलवाले' अशा अनेक सिनेमात खलनायिकेची (Pradeep Kabra) भूमिका साकारणारा  अभिनेता प्रदीप काबरा सध्या श्रीलंकेची (Sri lanka) स्वारी करत आहे.  त्यानं नुकतंच श्रीलंकेला भेट दिली होती. या दौऱ्यादरम्यान, त्यानं अनेक पर्यटन स्थळांना भेट दिली आहे.  याचे व्हिडीओही त्याने सोशल मीडियात शेअर केले आहेत.  रावणाची लंका, अशोक वाटिका अशा अनेक जागांना त्याने भेट दिली. त्याने शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून,  नेटकऱ्यांनी हे व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Continues below advertisement

प्रदीप काबराने व्हिडीओतून दाखवली श्रीलंकेची सफर (Pradeep Kabra explores Ravanas Lanka)

प्रदीप काबराने सांगितलं की, श्रीलंकेतील प्रत्येक लहान - मोठ्या जागेला रावणाचे नाव देण्यात आले आहे. रावण ज्या ठिकाणी स्नान करायचे, ती जागी देखील प्रदीप काबराने आपल्या व्हिडीओतून दाखवली.  जिथे रावण स्नान करायचे, त्या जागेला, 'छोटा रावण फॉल' असे नाव देण्यात आले आहे.  प्रदीपने 'छोटा रावण फॉल'मध्ये आंघोळ देखील केली.  प्रदीपने आपल्या व्हिडीओतून रावणची गुहा देखील दाखवली.   या गुहेत देवी सीता यांना कैदेत ठेवण्यात आलं होतं.  रावणाची गुहा एला येथे स्थित आहे.  

प्रदीप म्हणाले की, तो श्रीलंकेतील एका म्युझियममध्ये गेला होता.  तिथे सापडलेल्या पुराव्यांनुसार, रावणने देवी सीता यांना एला येथील एका गुहेत लपवून ठेवलं होतं. त्या गुहेचं  नाव 'रावणाची गुहा' असं ठेवण्यात आले होते. यानंतर प्रदीप काबराने आपल्या व्हिडीओतून अशोक वाटीकेचा नजाराही दाखवला.  या ठिकाणी देवी सीता यांना ठेवण्यात आलं होतं.  अशोक वाटिका दाखवताना प्रदीप त्या निसर्गरम्य वातावरणात रमून गेले होते.  

Continues below advertisement

प्रदीप आपल्या व्हिडीओत म्हणाला की, 'हे ठिकाण इतके सुंदर आहे की,   याचे वर्णन शब्दांत करणंही कठीण आहे'. विशेष म्हणजे प्रदीपने ते झाडही दाखवले, जिथे माता सीता बसत होत्या, आणि भगवान हनुमान त्यांना तिथे येऊन भेटत होते.  यानंतर प्रदीपने आपल्या व्हिडीओतून रावणाची लंका दाखवली.  वाल्मिकी रामायणानुसार, रावणाची लंका त्रिकुटा पर्वतरांगेत वसलेली होती.  रावणाची लंका सोन्याची होती आणि त्याच्या आत रावणाचा भव्य सोन्याचा महाल होता. 

पण आता याचे अवशेषच शिल्लक आहेत.  प्रदीप काबराने ती देखील जागा दाखवली, जिथे रावणाचे सिंहासन देखील होते. प्रदीप काबराने शेअर केलेले व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून, त्याचे व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले आहेत.  घरी बसून दर्शन घेण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी अभिनेत्याचे कौतुकही केले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'छावा' सिनेमातील अभिनेता 'ईठा'मध्येही झळकला, श्रद्धा कपूरसोबत मराठीत बोलला, भन्नाट किस्साही सांगितला