Bigg Boss Marathi 6 Promo Goes Viral: बिग बॉस मराठी सिझन 6 या रिअॅलिटी शोची क्रेझ प्रेक्षकांमध्ये वाढत चालली आहे. या शोमधील कलाकारांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.  यंदाच्या बिग बॉस सिझन 6 मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कलाकार सहभागी झाले आहेत. या स्पर्धकांमध्ये एक नाव सगळ्यात चर्चेत आहे, ते नाव म्हणजे प्रभू शेळके.  प्रभू शेळकेने सोशल मीडियातील व्हिडिओंमुळे प्रसिद्धी मिळवली. बऱ्याचदा तो ट्रोल होतो. मात्र, अलिकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. प्रभू शेळके चंद्रा या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.  नुकतंच भाऊच्या धक्क्याचा  प्रोमो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात सगळे स्पर्धक गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसेच प्रभू शेळकेही चंद्रा या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सध्या भाऊच्या धक्क्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करतात. ते चुकणाऱ्याला जाब आणि उत्तमरित्या टास्क पूर्ण करणार्‍याचे कौतुक करतात. यावेळी अनेकदा गमतीजमतीही होतात.  बिग बॉस मराठी सिझन 6 मधील टास्क हे भन्नाट असतात. यावेळी अनेक गमतीजमती घडतात. यामुळे प्रेक्षक खळखळून हसतात. तर, काहीवेळेस स्पर्धकांमध्ये कडाक्याचे भांडण होते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यामध्ये स्पर्धकांची शाळा घेतात.  चुकीच्या वागणाऱ्या स्पर्धकाला जाब विचारतात. 

शनिवारी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने काही स्पर्धकांना खेडबोल सुनावले. दरम्यान, नुकतंच कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर  बिग बॉस मराठी सिझन 6 चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धक थिरकताना दिसत आहे.  यात प्रभू शेळकेचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. सध्या बिग बॉसमधील भाऊच्या धक्क्याचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

Continues below advertisement

कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर भाऊच्या धक्क्याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.  या प्रोमोमध्ये रितेश देशमुख घरातील सदस्यांना चान्स पे डान्स हे टास्क देतो. टास्क सुरू होताच घरातील स्पर्धक विविध गाण्यांवर थिरकतात. या प्रोमोच्या व्हिडिओमध्ये सुरूवातीला, 'दिल मैं बजी गिटार' हे गाणं वाजतं.  या गाण्यावर बिग बॉसच्या घरातील सदस्य थिरकताना दिसत आहेत.  तसेच प्रभू शेळके देखील थिरकताना दिसत आहे. त्याचे स्टेप्स इतर कलाकारांपेक्षा हटके आहेत. प्रभू शेळके चंद्रा या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.  रितेश देशमुख देखील प्रभू शेळकेची स्टेप कॉपी करतो.   यानंतर सगळे स्पर्धक हसताना दिसत आहेत. 'जेव्हा मिळणार चान्स तेव्हा भाऊच्या धक्क्यावर होणार डान्स', असं कॅप्शन देत प्रोमोचा व्हिडिओ कलर्स मराठी वाहिनीने व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार, हे लवकरच समोर येईल.