Prabhas Fauzi Shoot Crew Member Death: दाक्षिणात्य सुपरस्टार (South Superstar) प्रभास (Actor Prabhas) सध्या त्याचा आगामी सिनेमा 'फौजी'मुळे (Fauzi Movie) चर्चेत आहे. या सिनेमाचं शुटिंग सध्या हैदराबादमध्ये (Hyderabad) सुरू आहे. अशातच सध्या या शुटिंगदरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेबाबत माहिती समोर येत आहे. प्रभासच्या 'फौजी' सिनेमाचं हैदराबादमध्ये सुरू असलेलं शुटिंग  अचानक थांबवावं लागलं आहे. हैदराबादजवळ झालेल्या रस्ते अपघातात सिनेमाच्या युनिटमधील एका सदस्याचा मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात इतर पाच जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. 

Continues below advertisement

मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमाच्या शूटसाठी रामोजी फिल्म सिटीकडे सेटवर जात असतानाच हा अपघात घडला. हैदराबादजवळ असलेल्या अब्दुल्लापुरमेटजवळ वाहनाचा ताबा सुटून ते थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळलं. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

'फौजी'च्या क्रू मेंबर्ससोबत झालेल्या या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. तर इतर पाचजण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोकल अथॉरिटीनं रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

क्रू मेंबर्सच्या कुटुंबीयांना दिली अपघाताची माहिती

'फौजी' सिनेमाच्या क्रू मेंबर्सच्या अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरली आहे, पण अजूनही प्रभासकडून या अपघातासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मिडिया रिपोर्टनुसार,  क्रू मेंबर्सच्या कुटुंबीयांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, प्रभासच्या 'फौजी' सिनेमाची घोषणा 2025 मध्ये, त्याच्या 46 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्यात आलेली. या सिनेमातील त्याचा 'फर्स्ट लूक' देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. 'मैत्री मूव्ही मेकर्स'च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) दिलेल्या माहितीनुसार, 'फौजी'चं शुटिंग सुमारे 80 टक्के पूर्ण झालं आहे. शुटिंगचं उर्वरित वेळापत्रक अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण यामध्ये प्रभासचे तीन प्रमुख ॲक्शन सीन्स शूट केले जाणार आहेत. सिनेनिर्माते हा चित्रपट ऑक्टोबर 2026 मध्ये प्रदर्शित करण्याचं नियोजन करत आहेत. या सिनेमात प्रभाससोबतच मिथुन चक्रवर्ती आणि जया प्रदा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Akshay Kumar: अक्षय कुमारनं केलं डोळ्याचं ऑपरेशन; बॉलिवूडचा खिलाडी घेणार कामातून ब्रेक; पुढचे 5 सिनेमे पेंडिंग