Actress praveena Deshpande passed away: मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रविणा देशपांडे यांचं आज निधन झालं आहे. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री प्रवीणा यांच्या instagram आणि facebook अकाउंट वर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची दुःखद बातमी जाहीर केली आहे. हिंदू स्मशान घाटावर आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अलीकडेच अभिनेत्री प्रविणा देशपांडे इम्रान हाश्मीच्या तस्करी या वेब सिरीजमध्ये नुकत्याच दिसल्या होत्या. 

Continues below advertisement

कुटुंबीयांनी सोशल मीडियावर दिली दुःखद बातमी

प्रविणा देशपांडे यांच्या परिवाराने त्यांच्या instagram वर पोस्ट शेअर करत लिहिलं की' कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, श्रीमती प्रवीणा देशपांडे यांचा 17 फेब्रुवारी 2026 रोजी निधन झालं. दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. या पोस्टवर कमेंट करत अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

मराठी रंगभूमी ते बॉलीवूड

मराठी मनोरंजनसृष्टीसह हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं कायम कौतुक होत आलं आहे. रंगभूमीतून अभिनयाचा प्रवास सुरू झालेल्या प्रविणा यांना अभिनयाचे बारकावे नाटकांमधून, नाटकांमधील भूमिकांमधून कळत गेले. नंतर मालिका, टीव्ही, ओटीटी, चित्रपट यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून त्या समोर आल्या. मराठी मालिकांमध्ये अनेकदा कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या महिलांच्या भूमिका त्यांनी साकारलेल्या. या भूमिका मराठी प्रेक्षकांनीही वाखाणल्या. बॉलीवूडमध्ये निवडकच पण दमदार भूमिका त्यांनी साकारल्या. जलेबी, द फॅमिली मॅन, एक विलन, गब्बर इज बॅक, हॅक्ड, ब्लॅकमेल यासारख्या सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसलाय.

Continues below advertisement

सलमान खान आणि असीनची फिल्म रेडी मध्येही प्रविणा यांनी भूमिका साकारलेली. सहकलाकाराच्या भूमिकेत दिसलेल्या प्रवीण यांनी शेवटचं काम नीरज पांडे यांचा वेब सिरीजमध्ये केलेलं. तस्करी या वेब सिरीजमधून काम करत त्यांनी कामाचा एक वेगळा ठसा निर्माण केला. आपल्या संवेदनशील अभिनयाने आणि सहाय्यक भूमिकांमधून त्यांनी घराघरात लोकप्रियता निर्माण केली .