एक्स्प्लोर

TV Actor Arrest:16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक

'काशीबाई बाजीराव बल्लाळ'मध्ये बाजीराव आणि 'पांड्या स्टोअर'मध्ये धवल मकवाना यांची भूमिका साकारली होती.

TV Actor Rohit Chandel Arrest:प्रसिद्ध टीव्ही कलाकार रोहित चंडेल (Rohit Chandel) याच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 16 वर्षीय कलाकार मुलीचा पाठलाग करणे, तिला वारंवार फोन करणे, तिचा छळ करणे आणि तिच्यावर हल्ला केल्याप्रकरणी या अभिनेत्याला घाटकोपर पोलिसानी अटक केली आहे (TV Actor Arrest) .या कलाकाराचे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अश्याच प्रकारे या अगोदर ही एक दुसऱ्या सहकलाकार बाबत त्याने असेच कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यावर या अगोदर ही दोन गुन्हे दाखल आहेत. 29 वर्षीय अभिनेता रोहित चंडेलने 'काशीबाई बाजीराव बल्लाळ'मध्ये बाजीराव आणि 'पांड्या स्टोअर'मध्ये धवल मकवाना यांची भूमिका साकारली होती.घाटकोपर पोलीस याचा पुढील तपास करीत आहे. (popular Hindi TV Actor Arrested)

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीने रोहित चंडेलविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आरोपी अभिनेता वारंवार तिच्या मोबाईलवर फोन करत होता. एवढंच नाही, तर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधत तिला त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत पुढे म्हटलं आहे की, 5 जुलै रोजी रोहितने मुलीचा तिच्या घराजवळ पाठलाग केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वेळी त्याने शिवीगाळ करत मुलीला मारहाण केल्याचाही आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी आणि रोहित चंडेल यांची यापूर्वीपासून ओळख होती.

पॉक्सोसह अनेक कलमांखाली गुन्हा

या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी रोहित चंडेलविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 78 आणि 115(2) अंतर्गत पाठलाग करणे आणि दुखापत केल्याप्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माहितीनुसार, शुक्रवारी दहिसर येथील राहत्या घरातून रोहित चंडेलला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला विशेष पॉक्सो न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.या घटनेमुळे रोहित चंडेलच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर अद्याप रोहित चंडेल किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून तक्रारीतील सर्व आरोपांची सखोल चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget