Jung Eun-woo Death: जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या के- ड्रामा पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियाचा अभिनेता जंग-उन-वू या लोकप्रिय कलाकाराचं वयाच्या 39 व्या वर्षी निधन झालं. अकाली जगातून निरोप घेतल्यामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. पण मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर अभिनेत्याने शेअर केलेली एक क्रिप्टिक पोस्ट सध्या चर्चेत आहे. मृत्यूच्या केवळ एक दिवस आधी अभिनेत्याने एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. या क्रिप्टिक पोस्टमुळे चहात्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाण्यापूर्वी अभिनेत्याला मृत्यूची चाहूल लागली होती की काय अशा प्रतिक्रिया यावर व्यक्त होत आहेत.

Continues below advertisement

दक्षिण कोरियन अभिनेते जंग यून वू या अभिनेत्याने Welcome To Waikiki 2’ आणि ‘Bride Of The Sun’ या मालिकांमुळे ते प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले होते. जंग युन-वू यांचा अंत्यसंस्कार 13 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी, बुधवारी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.

शेवटची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

अभिनेत्याच्या  निधनानंतर सोशल मीडियावर चाहते श्रद्धांजली  व्यक्त करत असताना, त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वतःच्या फोटो सोबत हँगकाँगचे दिग्गज अभिनेते लेसली चुंग आणि ब्रिटिश गायिका एमी वाईनहाऊस यांचेही फोटो शेअर केले होते. आणि विशेष म्हणजे या दोन्ही कलाकारांचा मृत्यू त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना झाला होता. या पोस्टला त्याने 'आठवण येतेय, हेवा वाटतोय, खंत वाटतेय' असं लिहिलं होतं.

Continues below advertisement

 

चाहते अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. एका सोशल मीडिया युजरने कमेंट करत म्हटलं, “तुम्ही आणखी चांगल्या जगात अधिक उजळून निघा, अशी मी प्रार्थना करतो.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने भावना व्यक्त करत लिहिलं, “खूपच वेदनादायक बातमी! तो जणू निरोपच देत होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.”