Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडे (poonam pandey) लॉक-अप (Lock Upp) शोमुळे चर्चेत होती. पण या शोमधून ती आऊट झाली आहे. शोमध्ये असताना पूनमनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रेक्षकांना सांगितलं होतं. तेव्हा तिनं एक गौप्यस्फोट केला होता. पूनमनं शोमध्ये सांगितलं होतं की, ती घरगुती हिंसाचाराला बळी पडले आहे आणि तिचा पूर्व पती सॅम बॉम्बे तिला बेदम मारत होता.
पूनमनं शोमध्ये सांगितलं की,अनेकवेळा आत्महत्या करायचे विचार तिच्या मनात आले होते. एका मुलाखतीमध्ये पूनमनं सांगितलं, ' घरगुती हिंसाचारामुळे मला ब्रेन हॅमरेज झाले होते. मला कोणत्याही गोष्टीचा वास येत नव्हता. मी आजूबाजूच्या लोकांना एखाद्या गोष्टीच्या वासाबद्दल विचारत होते. ब्रेन हॅमरेजनंतर मला अनेक समस्या जाणवू लागल्या पण मी तेव्हा मेंटली आणि फिजिकली खूप मजबूत झाले. '
मुलाखतीमध्ये पूनमनं सांगितलं, 'माझी ब्रेनची सर्जरी पूर्णपणे बरी होऊ शकली नाही. कारण सॅम एकाच ठिकाणी मला मारत होता. त्यामुळे माझी तब्येत ठिक होत नव्हती. मी जखम लपवण्यासाठी त्यावर मेक-अप लावत होते. ' गेल्या वर्षी पूनमनं सॅमच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दोघांनी सप्टेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती.
रिपोर्टनुसार, पूनम पांडेनं लॉक-अप या शोसाठी तीन लाख रूपये मानधन घेते होते. नशा या चित्रपटामुळे पूनमला लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये पूनम प्रेक्षकांना वेगवेगळे आणि अजब असे प्रॉमिस करत होती.
हेही वाचा :
- Filmfare Awads Marathi : एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'ने पटकावला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार
- Potra Movie : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'पोटरा' सिनेमाची बाजी, ठरला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट
- Will Smith, Chris Rock : ‘थप्पड’ प्रकरणाचा विल स्मिथला बसलाय मानसिक धक्का, अभिनेता घेतोय थेरपीची मदत!
- Happy Birthday Ashwini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा चेहरा! जाणून घ्या अभिनेत्री अश्विनी भावेंबद्दल...