एक्स्प्लोर

Pooja Birari On Mother In Law Suchitra Bandekar: 'सासू स्ट्रिक्ट आहे...'; पूजा बिरारीचं सासुबाई सुचित्रा बांदेकरांबाबतचं 'ते' वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली?

Pooja Birari On Mother In Law Suchitra Bandekar: सुचित्रा बांदेकर पूजाच्या सासुबाई असल्या तरी त्यांच्यात खूप गोड नातं आहे, असं पूजानं सांगितलं.

Pooja Birari On Mother In Law Suchitra Bandekar: सासू-सुनेच्या नात्याबाबत आपल्यापैकी कुणालाच फारसं सांगायची गरज नाही. सासू-सुनेचं नातं प्रत्येकाच्याच जीवनाचा भाग असतं. आजवर जेवढे मीम्स सासू-सुनेच्या नात्यावर तयार झालेत, तेवढे कदाचितच दुसऱ्या कोणत्या नात्यावर झाले असतील. असंच हे वाद-विवाद, कधी रुसव्या-फुगव्यांनी सजलेलं नातं आता काळानुसार मात्र बदलत चाललंय. त्या दोघीही एकमेकींना समजून घेतात. हल्लीच्या सासवा सुनेसोबत जमवून घेण्यासाठी जेवढे शक्य तेवढे प्रयत्न करताना दिसतात. तर, दुसरीकडे सुना सासुबाईंना खूश करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत जमवून घेण्यासाठी प्रयत्न करतात. प्रेक्षकांना नेहमीच सेलिब्रिटींच्या आयुष्याबाबत कुतूहल असतं. असंच एक सेलिब्रिटी कुटुंब म्हणजे, बांदेकर कुटुंब. या कुटुंबातली सासू-सुनेची जोडी म्हणजे, सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) आणि पूजा बिरारी. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्या लेकानं म्हणजेच, सोहम बांदेकरनं (Soham Bandekar) काही महिन्यांपूर्वी मराठी अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja Birari) लग्नगाठ बांधली आणि पूजा बांदेकरांची सूनबाई झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना पूजा बिरारीनं आपल्या सासरच्यांसोबतच्या नात्याबाबत भाष्य केलंय. 

अभिनेत्री पूजा बिरारीनं (Marathi Actress Pooja Birari) मुलाखतीत बोलताना सासुबाई सुचित्रा बांदेकरांबाबत भाष्य केलंय. सासुबाई स्ट्रिक्ट आहेत का? यावर बोलताना पूजा बिरारीनं तिच्या आणि सुचित्रा बांदेकरांच्या नात्याबाबत सांगितलं. सुरुवातीला मला आईंबाबत आदरयुक्त भीती वाटत होती. पण, त्या खूप गोड आहेत, असं पूजा बिरारीनं सांगितलं. 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पूजानं तिच्या आणि सुचित्रा बांदेकरांच्या नात्याबाबत स्पष्ट सांगितलं. 

सासुबाई सुचित्रा बांदेकरांबाबत काय म्हणाली पूजा बिरारी? (Pooja Birari On Suchitra Bandekar)

"मला कोणी विचारलं की, तुझी सासू कशी आहे? तर मी मुद्दाम त्यांना सांगयचं म्हणून सांगते की, 'त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. मी त्यांच्यासमोर एकमद शांत असते...' पण सुरुवातीला मला आईंबाबत आदरयुक्त भीती वाटत होती. कारण आमची जेव्हा पहिली भेट झाली, तेव्हा सोहमनं मला सांगितलंच नव्हतं की, आज आपल्याला आईला भेटायचंय. मी अगदी नॉर्मल तिथे गेली. पण त्या अचानक समोर आल्यावर मला सरप्राइज टेस्ट असल्यासारखं वाटलं. मी अशी अचानक त्यांना भेटायला गेल्यामुळे माझ्या पोटात त्यावेळी गोळा आला होता. बाकी त्या गोड खूप आहेत. पण जेव्हा पहिल्यांदा घरी गेले आणि त्यांनी एका वाक्यात माझ्या मनातली भीती शांत केली होती. त्या म्हणालेल्या की, या क्षणाला कसं रिएक्ट व्हायचं मलासुद्धा कळत नाहीये. आपण दोघी सेम पेजवर आहोत. त्यामुळे मला थोडं हायसं वाटलं. पण आमच्या दोघींच्याही मनात सोहमबद्दल राग होता, कारण त्यानं आम्हाला न सांगता भेटवलं होतं..."

पुढे बोलताना पूजा बिरारी म्हणाली की, "कालांतरानं आमची ओळख वगैरे झाली, तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की, मला मुलगी नाहीये. पण मला खूप हौस आहे, या सर्व गोष्टींची... त्यामुळे मी गिफ्ट देताना नाही म्हटलंस तर याद राख... खूप कम्फर्ट आहे, आमच्या नात्यात, समजुतदारपणा आहे. आता ती पहिल्यासारखी भीती उरलेली नाही. अजून काय हवं एखाद्या मुलीला... कारण लग्नापूर्वी सासूवरुन एकप्रकारची धास्ती घातलेली असते मनात. पण लग्नानंतर ती भीती कमी झालेली आहे... माहीत नाही का? पण इंडस्ट्रीमध्ये आईंबद्दल एक प्रकारची भीती आहे. पण मला असं पण वाटतं की, ती भीती असलीच पाहिजे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Puja Birari On Aadesh Bandekar:'माझी मुलगी असली असती तर...'; पूजा बिरारीचं सासरेबुवा आदेश बांदेकरांबाबतचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
Drishyam 3 Marathi Actress: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर
अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर
Kiran Rao on Relationship: 'लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं नॉर्मल'; आमिर खानच्या एक्स बायकोचं बोल्ड वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
'लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं नॉर्मल'; आमिर खानच्या एक्स बायकोचं बोल्ड वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' पाहून प्रेक्षकांचे डोकं चक्रावलं; रविवारी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस, शाहरुख खानच्या 'या' सिनेमाचा मोडला रेकॉर्ड
'दृश्यम 3' पाहून प्रेक्षकांचे डोकं चक्रावलं; रविवारी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस, शाहरुख खानच्या 'या' सिनेमाचा मोडला रेकॉर्ड
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Embed widget