Suchitra Bandekar on Pooja Birari: मराठी अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ' येतेच आता मी आनंदायला ' (Yetech ata mi Nandayla) असे तिच्या आगामी मालिकेचं नाव असून, या मालिकेची निर्मिती, सोहम प्रॉडक्शनने केली आहे. अलीकडेच मालिकेसंदर्भात पूजा बिरारी हिची सासू सुचित्रा बांदेकर (Suchitra bandekar) यांनी मुलाखत दिली आहे.  या  मुलाखतीत त्यांनी पूजा बिरारीला मालिकेत घेण्यामागचं कारण सांगितलं. तसेच या मालिकेसाठी पूजाने आधी नकार दिला होता, असं सुचित्रा बांदेकर म्हणाल्या. नेमका किस्सा काय? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

पूजाला ऑडिशनसाठी विचारताच म्हणाली 'नाहीच!', सुचित्रा बांदेकरांनी सांगितला किस्सा (Pooja Birari Initially Refused to Audition for Her Upcoming Serial)

सुचित्रा बांदेकर यांनी अलीकडेच 'येतेच आता मी नांदायला ' या मालिकेच्या संबंधित राजश्री मराठीला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत त्यांनी पूजा बिरारीची या मालिकेत एन्ट्री कशी झाली? याबाबत त्यांनी सांगितलं. सुचित्रा बांदेकर म्हणाले की, मी पूजाला विचारलं होतं की, ऑडिशन देते का?  ती म्हणाली, नको, सगळ्यांना वाटेल आपलं प्रोडक्शन हाउस आहे. म्हणून मला तुम्ही कास्ट केलं '.

'मी तिला म्हटलं, बाळा बोलणारे 10 तोंडाने बोलणारच आहेत. शेवटी आपले आणि झीचे पैसे लागले आहेत.  आणि आपल्या इथे घरची आहेस म्हणून घेतोय, असा फंडा कधी चालतच नाही. मी म्हटलं, मनापासून ऑडिशन देणार असशील तर दे...  ती म्हटली हो, मला काम तर करायचं आहे. तिने ऑडिशन दिली. मग मी तिची ऑडिशन क्लिप पाठवली. बऱ्याच जणी शॉर्ट लिस्ट झाल्या होत्या. मग झीने पूजाची निवड केली ', असं सुचित्रा बांदेकर म्हणाल्या.

Continues below advertisement

'प्रोडक्शनमध्ये असताना समोरचा व्यक्ती कलाकार म्हणून चांगला पाहिजे, सोबत माणूस म्हणूनही चांगला पाहिजे. स्वामींच्या कृपेने आतापर्यंत माझ्या आयुष्यात चांगली माणसं जोडली गेलेली आहेत.  जी वाईट असतात ते, आपोआप दूर होतात ' असंही सुचित्रा बांदेकर म्हणाल्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Kedar Shinde: 'स्वामींवर चित्रपट तयार करून, मी त्यांचा व्यवसाय नाही करू शकत', केदार शिंदे स्पष्टच बोलले, 'कित्येक जण..'