Pinga G Pori Pinga Marathi Serial Track: आपण आजवर दोन भावांवर, आई मुलावर, बाप-लेकीवर केलेल्या बऱ्याच कविता ऐकल्या आहेत, पण दोन मैत्रिणींवरील कविता कधी ऐकली आहे का? मैत्रिणी एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू शकतात? त्या कठीण प्रसंगी एकमेकींची साथ देऊ शकतील? पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात हेच प्रश्न आता उभे राहणार आहेत. एका आनंदाच्या क्षणाचं रूपांतर एका अनपेक्षित आणि धक्कादायक घटनेत झालं आहे.
मिठूच्या सरप्राइझची वाट पाहत असलेल्या पिंगा गर्ल्सना आयुष्यात अचानक एक मोठा धक्का धक्का बसला. तेजा आणि हर्षितसाठी खास सरप्राईज प्लॅन करणाऱ्या मिठूला काही वेळातच घरात गंभीर अवस्थेत आढळले. तेजानं हाक मारण्यासाठी आत जाताच तिच्या किंकाळीनं पिंगा गर्ल्सचं घरं हादरवलं. पिंगा गर्ल्ससमोर कठीण आव्हान उभे राहिले आहे. या एका घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री पणाला लागणार आहे.
मिठूवर घडलेल्या प्रसंगामुळे पाचही जणी हादरल्या आहेत, संपूर्ण घर अस्वस्थ झाले आहे. संपूर्ण प्रसंगामागील सत्य शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. घटनेच्या कारणांमागे नेमकी कोणती पार्श्वभूमी आहे, याचा शोध घेण्याचं आव्हान आता उभं राहिलं आहे. वल्लरीसाठी आता नवी परीक्षा उभी राहिली आहे. सर्वात स्थिरबुद्धीची आणि जबाबदार असलेल्या वल्लरीला आता मैत्रिणींना सांभाळावं लागणार आहे. संपूर्ण ग्रुप भावनिक तणावात असताना, त्यांना आधार देणं आणि पुढील योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणं, ही तिच्यासमोरची महत्त्वाची जबाबदारी आहे. या घटनेनंतर पिंगा गर्ल्समधील नातेसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तुटलेल्या घराला सावरण्याचं काम वल्लरी आणि प्रेरणा करत आहेत. श्वेता आणि तेजा मानसिकदृष्ट्या खचल्या असून प्रेरणा आणि वल्लरी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंगा गर्ल्सची मैत्री अजून घट्ट होईल का? की त्यांच्यातील दुरावा आणखीनच वाढेल? या परिस्थितीत पिंगा गर्ल्स एकत्र राहील की, या घटनेमुळे मैत्रीवर परिणाम होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पोलीस तपास सुरू होणार असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत अनेक अनुत्तरित गोष्टीसमोर येणार आहेत.वल्लरी आणि तिच्या मैत्रिणींनी आता एकत्र येऊन या घटनेचं सत्य शोधण्याची गरज आहे. संपूर्ण प्रकरण उलगडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांना मोठा लढा द्यावा लागणार आहे.अशातच या घटनेमुळे या पाच मैत्रिणीचे आयुष्य कसं बदलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.