Pinga g pori pinga Marathi serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका पिंगा गं पोरी पिंगा’ मध्ये सध्या रहस्य, थरार आणि भावनिक उलथापालथ यांचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. बुलबुल बागेत सुरू असलेलं नाट्यमय वातावरण आणखी गहिरं होत चाललं आहे. वल्लरीची चाहती म्हणून बेळगावहून मुंबईत आलेली मीनाक्षी अचानक गायब झाल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरच्यांना न सांगता परीक्षा देण्यासाठी आलेली ही निरागस, साधी मुलगी कुठे गायब झाली? तिच्या मागे कोण आहे? हा भयानक प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करून बसला आहे. याचे उत्तर मिळणार आहे मालिकेच्या महारविवार विशेष भागात, जो 14 डिसेंबर रोजी संध्या 7 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Continues below advertisement

पिंगा गर्ल्सच्या मदतीने शोधमोहिम

मीनाक्षी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच वल्लरी धावतच बुलबुल बागेतल्या सर्व पिंगा गर्ल्सना एकत्र करते. प्रत्येकाची काळजी वाढलेली, मनात भीती तरीही सगळ्या मुली एकजुटीने मीनाक्षीचा शोध घेण्याचा निर्धार करतात. आणि त्यातून सुरू होते तगडी शोधमोहीम… परिसरातील अरुंद गल्ली-बोळ, मैदाने, स्थानकं आणि मीनाक्षी शेवटची दिसली त्या भागात मुली अविरत फिरत राहतात. चौकशी, शोध आणि धागेदोरे जोडत असताना त्यांना काही धक्कादायक संकेतही मिळू लागतात.

Continues below advertisement

मीनाक्षीचं अपहरण झालंय का? सुगावा लागला

या संशयानं बुलबुल बागेतील वातावरण अधिक गंभीर होतं. त्यातच अलीकडेच या वस्तीमध्ये दाखल झालेली मंजुषा, जी एका प्रतिष्ठित आश्रमाशी जोडलेली असल्याचं सांगते, तिच्यावर संशयाची सुई फिरू लागते. तिचं रहस्यमय वागणं आणि वस्तीतील नव्या हालचाली काहीतरी मोठ्या कटकारस्थानाकडे निर्देश करत असल्याचं पिंगा गर्ल्सच्या लक्षात येतं. सगळ्या मुली एकत्र रात्रंदिवस मीनाक्षीच्या शोधात धडपड करत आहेत. वल्लरीचं मन अधिक बेचैन होत चाललं आहे, कारण प्रत्येक मिळणारा छोटासा पुरावादेखील एका मोठ्या रॅकेटच्या दिशेनं इशारा करत आहे, अशी चर्चा बुलबुल बागेत रंगू लागली आहे.

मीनाक्षी नेमकी कुठे आहे? तिच्या गायब होण्यामागे कोणाचा हात आहे? मंजुषा खरंच संशयित आहे की अजून कोणीतरी सावलीत लपलंय? आणि वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीनं हे रहस्य उलगडू शकेल का? याचे उत्तर मिळेल 14 डिसेंबरला, महारविवार विशेष भागात, जेव्हा बुलबुल बागेत उलगडणार आहे एक धक्कादायक सत्य!

शोधमोहीम जसजशी खोलात जाते तसतसे काही धक्कादायक संकेत समोर येऊ लागतात. मीनाक्षीचं अपहरण केलं गेल्याची शक्यता बळावते. त्यातच बुलबुल बागेत अलीकडेच दाखल झालेली मंजुषा जी एका प्रतिष्ठित आश्रमाशी जोडलेली आहे तिच्यावर आता संशयाची सुई वळू लागली आहे. अचानक बेपत्ता झालेल्या मीनाक्षीच्या शोधासाठी बुलबुल बागेतली प्रत्येक मुलगी रात्रंदिवस धडपड करत आहे. रहस्य अधिक गडद होत चाललं असून या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा सुगावा मिळत असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.