Payal Rohatgi casting couch allegation against Dibakar Banerjee: मनोरंजन क्षेत्रात कास्टिंग काउचच्या घटना बऱ्याच काळापासून घडत आहेत. अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. काहींनी धाडसीने आपल्यासोबत घडलेल्या वाईट अनुभव देखील शेअर केला आहे. काही अभिनेत्रींनी तडजोड करण्यास थेट नकार दिला. त्यामुळे चित्रपटांमध्ये भूमिका नाकारण्यात आल्याचा दावाही काही अॅक्ट्रेसने केला आहे. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिनं दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले होते. तिनं आरोप केला की, दिग्दर्शकाच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिल्याने तिला एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.
#Meetooच्या दरम्यान, अभिनेत्री पायल रोहतगीने धक्कादायक खुलासा केला होता. तिनं सांगितलं की, तिला एका दिग्दर्शकाने चित्रपट ऑफर केल्यानंतर अश्लील मागणी केली होती. पायलने दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीवर कास्टिंग काउचचा गंभीर आरोप केला होता. तिनं आरोप केला की, दिग्दर्शकाने तिला चित्रपटातील भूमिकेच्या बदल्यात तडजोड करण्यास सांगितले होते. शांघाय हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी याने ही अश्लील मागणी केली होती, असा आरोप अभिनेत्रीने केला.
पायलने सांगितले की, 'चित्रपटाच्या ऑडिशनसाठी दिग्दर्शकाला भेटली होती. दिबाकरने तिला तिचा स्कर्ट उचलून पोट दाखवण्यास सांगितले होते'. दिग्दर्शक अभिनेत्रीला म्हणाला, 'आधी तुला मला खूश करावे लागेल. मग तुला काम मिळेल', असा खुलासा अभिनेत्रीने केला. अभिनेत्री पायलने दिग्दर्शकाच्या मागणीला थेट नकार दिला. त्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले, असा धक्कादायक आरोप अॅक्ट्रेसने दिग्दर्शकावर केला. दरम्यान, दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पायलने केलेल्या खुलाशानंतर सिनेसृष्टीत अक्षरश: खळबळ उडाली.
पायल रोहतहीच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2002 साली झाली. 'ये क्यों हो रहा है?' या चित्रपटातून तिनं सिनेसृ्ष्टीत पाऊल ठेवलं. तेव्हापासून अभिनेत्रीनं मागे वळून पाहिलं नाही. तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पायल रोहतगी बिग बॉस 2 सह अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झाल्यास, 2022 साली तिनं कुस्तीपटू आणि अभिनेता संग्राम सिंहशी विवाह केला होता.
