Payal Gaming Viral Video Controversy: भारतातील सर्वात प्रसिद्ध गेमिंग इन्फ्लुएंसर्सपैकी (Gaming Influencers) एक असलेली 'पायल गेमिंग' (Payal Gaming) चर्चांमध्ये आहे. यासाठी कारणंही तसंच आहे. सध्या सोशल मीडियावर एक MMS व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 'पायल गेमिंग' असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून केला जात आहे. व्हायरल होणाऱ्या MMS मुळे खळबळ माजली आहे. अशातच अनेक युजर्सनी थेट दावा केला आहे की, त्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती 'पायल गेमिंग' आहे.
MMS व्हायरल झाल्यानंतर काय म्हणाली 'पायल गेमिंग'?
MMS व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर 'पायल गेमिंग'नं स्वतःच्या ऑफिशिअल हँडलवरुन एक लांबलचक पोस्ट लिहिली आणि स्पष्टीकरण दिलं. तसेच, त्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी मी नव्हेत असंही सांगितलं. त्यासोबतच तिनं, तिच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही दिला. पोस्टमध्ये पायलनं लिहिलंय की, "मी कधीच विचार केला नव्हता की, मला अशा खाजगी आणि वेदनादायी प्रकरणावर बोलावं लागेल... गेल्या काही दिवसांपासून, एक कंटेट ऑनलाईन व्हायरल होतोय, ज्यामध्ये माझं नाव आणि माझी ओळख त्या व्हिडीओतल्या व्यक्तीसोबत जोडली जात आहे... मी हे स्पष्टपणे आणि कोणत्याही शंकेशिवाय सांगू इच्छिते की, त्या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला मी नाही आणि त्याचा माझ्या आयुष्याशी, माझ्या निवडींशी किंवा माझ्या ओळखीशी काहीही संबंध नाही..."
'पायल गेमिंग'नं तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, "मी नेहमीच नकारात्मक गोष्टींवर बोलणं टाळत असते... पण सध्याच्या परिस्थितीत मला स्पष्टिकरण देणं आणि आवाज उठवणं योग्य वाटलं. केवळ माझ्यासाठीच नाहीतर, तर त्या सर्व महिलांसाठी ज्या अशाप्रकारे ऑनलाईन दुर्व्यवहार आणि चरित्र हननचा शिकार होतात... हा कोणताही हानिकारक कंटेट नाही... हे सर्व खोलवर आघात पोहोचवणारं आणि अत्यंत असंवेदनशील आहे... "
25 वर्षांच्या 'पायल गेमिंग'नं सोशल मीडियावर विनंती केलीय की, त्यांनी व्हायरल व्हिडीओ शेअर करणं टाळावं आणि त्यावरुन अफवा पसरवणंही थांबवावं. त्यांनी म्हटलं की, तिच्या नावाचा आणि प्रतिमेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि कायद्यानुसार जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी योग्य कायदेशीर पावलं उचलली जात आहेत. कृतज्ञता व्यक्त करताना, पायल म्हणाली की, या कठीण काळात ज्यांनी पाठिंबा, सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवला, त्यांच्याबद्दल ती मनापासून आभारी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :