Continues below advertisement

Payal Gaming: सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओत एक तरूणी पुरूषाशी जवळीक साधताना दिसत आहे. बरेच नेटकरी असा दावा करत आहेत की, या व्हिडिओतील तरूणी लोकप्रिय युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर पायल गेमिंग आहे. पण काही नेटकऱ्यांनी व्हायरल होणारा व्हिडिओ डीपफेक असल्याचं म्हटलं आहे. सध्या पायल गेमिंगचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये पायल गेमिंगने सिद्धिविनायक मंदिराला भेट दिलीये. तिने मंदिरातले काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. तिनं या फोटोंना लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे. 'मी 2026चा सामना करण्यास तयार आहे', असं कॅप्शन दिलं आहे. सध्या पायल गेमिंगची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पायल गेमिंग इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते. ती दैनंदिन आयुष्यातील पोस्ट सोशल मीडियात शेअर करत असते. तिनं नुकतंच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती. 2026 वर्षाची सुरूवात सकारात्मकतेने करत असल्याचं तिनं सांगितलं. इन्स्टाग्राम अकाउंटवर मंदिरातील काही फोटो शेअर करताना पायल गेमिंगने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "श्री सिद्धिविनायक मंदिरातील उर्जेमध्ये काहीतरी खास आहे. ज्यामुळे पॉझिटिव्ह उर्जा मिळते. वर्षाच्या पहिल्या दिवशी उर्जा मिळणे खास आहे. गणपती बाप्पा माझ्यासोबत आहे. मी 2026 सालचा सामना करण्यास तयार आहे", असं पायल म्हणाली.

गेल्या काही महिन्यांत पायल एका व्हायरल एमएमएस व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. या व्हिडिओत पायल गेमिंग असल्याचा दावा करण्यात आला होता. खोट्या दाव्यांमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या व्हिडिओबाबत पायलने 17 डिसेंबर 2025 रोजी एक निवेदन जारी केले होते. त्यात तिनं म्हटलं की, "मला कधीही वाटले नव्हते की, मला अशा वैयक्तिक आणि त्रासदायक विषयावर सार्वजनिकरित्या बोलावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून काही कंटेंट ऑनलाइन फिरत आहे. माझे नाव आणि प्रतिमा एका व्हिडिओशी जोडले गेले आहे. जे डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे", असं पायल म्हणाली.

"मी स्पष्टपणे आणि कोणत्याही शंकाशिवाय सांगू इच्छिते की, त्या व्हिडिओमधील मुलगी मी नाही", असं तिनं स्पष्ट केलं. पायल गेमिंगने ऑनलाइन छळ किती त्रासदायक असू शकतो, हे देखील स्पष्ट केलं. ती म्हणाली, "नकारात्मकतेचा सामना करताना मी नेहमीच शांत राहण्यावर विश्वास ठेवते. या विरोधात आवाज उठवणे गरजेचं आहे", असं पायल म्हणाली".