Parth Samthaans Marathi Roots Surprise Fans: हिंदी टिव्ही इंडस्ट्रीत प्रेक्षकांच्या मनात घर तयार करणारा अभिनेता म्हणजे पार्थ समथान. त्याचा मोठा चाहतावर्ग  आहे. पार्थच्या मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात. तो बऱ्याच मुलींचा क्रश आहे. पार्थ समथान हा सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या हा कलाकार कलर्स टिव्हीवरील 'सेहेर होने को हैं' या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.  या मालिकेत सध्या विवाह सोहळा दाखवला जात आहे.  यामुळे तो बऱ्याच पोर्टलला मुलाखती देताना दिसत आहे.     

'मराठी आणि पुण्याचा असल्याचा अभिमान'

पार्थ समथान हिंदी मालिकांमध्ये काम करत असल्यामुळे तो हिंदी भाषिक असल्याचं अनेकांना वाटलं.  तो उत्तर भारतीय आहे,  असा अनेकांचा समज आहे.  परंतु, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं  एक मोठा खुलासा केला आहे.  या मुलाखतीत त्यानं मराठी  असल्याचे अभिमानाने सांगितले. 'लोकांना असं वाटतं की मी नॉर्थ इंडियन आहे, पण मी मराठीच आहे आणि पुण्याचा आहे", असं त्यानं अभिमानाने सांगितलं.

'मी मराठी माणूस आहे'

एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, " मी खूप उत्तम मराठी बोलतो.  खरंतर लोकांना माहित नाही की, मी मराठी आहे. मी पुण्याचाच आहे.  अनेकांना वाटतं की मी नॉर्थ इंडियन आहे.  पण मी महाराष्ट्राचा आहे. मला उत्तम  मराठी येते", असं पार्थ समथान म्हणाला.  "मी आपला माणूस आहे. लोकांना वाटतं की मी तिकडचा आहे वगैरे, पण मी मराठी आहे.  मराठी माणूस आहे", असं त्यानं अभिमानाने सांगितलं.  पार्थच्या मुलाखतीतील या क्लिपवर नेटकऱ्यांनी कमेंट करून कौतुक केलं.  दरम्यान,  अभिनेत्याच्या तोंडातून मराठीचे बोल ऐकून  अनेक तरूणींनी आश्चर्य व्यक्त केलं. 

पुण्यातील तरूणाचा हिंदी सिनेसृ्ष्टीत डंका

पुण्यातील तरूण हिंदी टिव्ही इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करत असल्याचं पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं. सध्या पार्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मराठी कलाकार हिंदी मालिकांमध्ये  नाव गाजवतोय हे पाहून अनेकांनी अभिमान व्यक्त केला.  

पार्थ समथानचा चाहतावर्ग मोठा

पार्थ समथान सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.   त्याचे इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोइंग जास्त आहे. पार्थ समथान मध्यंतरी सीआयडी 2 मध्ये  एसीपीच्या भूमिकेत दिसत होता. या शिवाय त्याची कसौटी जिंदगी की 2 ही मालिका देखील प्रचंड गाजली. त्याची ही मालिका घराघरात पोहोचली.  या मालिकेमुळे त्याचा चाहतावर्ग वाढला.