Paparazzi Hit With Guns Kicked With Abhishek Bachchan Aishwarya Rai: जया बच्चन (Jaya Bachchan) आणि पॅपाराझींचा छत्तीसचा आकडा असल्याचं आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पॅपाराझींना पाहून जया बच्चन थेट त्यांच्यावर धावून गेल्याचंही आपण अनेक व्हायरल व्हिडीओंमधून पाहिलं आहे. पण, तुम्हाला माहितीय का? पॅपाराझी कल्चर (Paparazzi Culture) इंडस्ट्रीत केव्हापासून सुरू झालं? इंडस्ट्रीत पॅपाराझी कल्चर बच्चन फॅमिलीच्या (Bachchan Family) एका इव्हेंटपासूनच सुरू झालेलं. असं आम्ही नाहीतर एका महिला पत्रकारानं उदाहरण देऊन सांगितलं आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नापासूनच इंडस्ट्रीत पॅपाराझी कल्चरचा उदय झाल्याचं या पत्रकारानं सांगितलं. एवढंच नाहीतर ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नात (Aishwarya Rai Abhishek Bachchan Wedding) पॅपाराझींना लाथआबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

2007 मध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी लग्नगाठ बांधली आणि बच्चन कुटुंबातलं हे लग्न त्या वर्षातलं सर्वात मोठं लग्न म्हणून ओळखलं गेलं. जनतेपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण या लग्नाचं कौतुक करत होते. काही पब्लिकेशन्सनी ऐश्वर्या आणि अभिषेकला 'पॉवर कपल' म्हटलं, तर काहींनी 'बॉलिवूडमधील सर्वात हॉट स्टार्सचं लग्न...', असं हेडिंग दिलं. प्रत्येक पब्लिकेशनकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एकच फोटो होता, जो एका पॅपाराझीनं गपचूप काढलेला. दरम्यान, लग्नादरम्यान काहीतरी घडलं, ज्यामुळे पापाराझींनी संपूर्ण बच्चन कुटुंबावर बंदी घातली.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नात पापाराझींसोबत हाणामारीही झाली. वरिष्ठ पत्रकार हिना कुमावती यांनी त्यावेळी नेमकं काय घडलेलं, ते एका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सांगितलं. हिना कुमावती यांनी सांगितलं की, माध्यमांचे प्रतिनिधी या जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी दिवसभर जलसाच्या बाहेर ताटकळत उभे असल्याचंही सांगितलं.

"आम्ही बच्चन कुटुंबाच्या घराबाहेर उभे होतो अन् वरिंदरनं गुपचूप फोटो काढला..."

हिना कुमावती यांनी सांगितलं की, "आम्ही अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न कव्हर करण्यासाठी बच्चन कुटुंबाच्या घराबाहेर सुमारे तीन दिवस उभे राहिलो. लग्नाची मिरवणूक आली, तेव्हाही आम्हाला साधी त्या समारंभाची झलकही दिसली नाही. त्याचवेळी, तिथेच असलेल्या वरिंदर (पापाराझी वरिंदर चावला) नं अभिषेकचा वराच्या आऊटफिटमधला आणि ऐश्वर्याचा नववधूच्या साजातला फोटो काढला..."

"अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नानं भारतात पॅपाराझी कल्चरची सुरुवात झाली..."

हिना कुमावती यांनी सांगितलं की, त्या क्षणानं आणि त्या फोटोनं सर्व काही बदललं, विशेषतः प्रसारण माध्यमांसाठी... तेव्हा आम्हाला कळलं की, मोठे कॅमेरे घेऊन धावणं, शॉट सेट करणं आणि नंतर फोटो काढणं आता व्यावहारिक राहिलेलं नाही. दरम्यान, वरिंदरनं त्याच्या फोननंच फोटो काढला आणि तो व्हायरल झाला. तो प्रत्येक वर्तमानपत्र आणि पब्लिकेशन्सनी पब्लिश केलेला..." माझं हे वक्तव्य कदाचित चुकीचंही असेल, पण भारतातील पॅपाराझी संस्कृती तिथूनच सुरू झाली.

"अमर सिंहच्या सुरक्षारक्षकानं आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली..."

दरम्यान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर वरिंदर चावलासाठी हा क्षण खूप महागात पडला. हिना कुमावती यांनी सांगितलं की, "तिथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आमच्याशी फारच गैरवर्तन केलं. आम्हाला मारहाण करण्यात आली. त्यावेळी बच्चन फॅमिलीच्या लग्नासाठी अमर सिंहची सुरक्षा तैनात होती. त्यांनी आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या हातातल्या बंदुकांनीही मारलं. त्या घटनेनंतर फोटोग्राफर्सनी बच्चन कुटुंबाच्या पब्लिक इव्हेंटचं कव्हरेज करण्यास बंदी घातली..."

"पॅपाराझींनी बच्चन कुटुंबावर बंदी घातली, नंतर ती उठवली..."

ही निदर्शने कशी सुरू झाली हे तिनं पुढे स्पष्ट केलं. हिना कुमावती म्हणाल्या की, "जेव्हा जेव्हा बच्चन एखाद्या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबासोबत फोटो काढायचे, तेव्हा प्रत्येक फोटोग्राफर्स त्यांचा कॅमेरा वरच्या दिशेनं घेऊन जायचे आणि फोटो काढण्यास नकार द्यायचे. काही कार्यक्रमांमध्ये हे घडल्यानंतर, कुटुंबाला काहीतरी चूक असल्याचं जाणवलं. शेवटी, त्यांनी आम्हाला मॅरियट हॉटेलमध्ये बोलावलं, आमच्याशी वैयक्तिकरित्या बोलले आणि माफी मागितली. त्यानंतरच बच्चन कुटुंबावरची ही बंदी उठवण्यात आली..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Public Angrey On Shah Rukh Khan: 'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?