Pandharichi Vari : मराठी संस्कृतीतील अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी परंपरा म्हणजे पंढरीची वारी (Pandharichi Vari). दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत विठोबा-माउलीच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठतात. या अद्वितीय व ऐतिहासिक परंपरेवर आधारित "पंढरीची वारी" (Pandharichi Vari) हा सिनेमा निर्मात्यांनी अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने मांडला आहे. या चित्रपटातून वारीचा अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पैलू उलगडला जातो. हा सिनेमा 1988 साली रिलीज झाला होता. आषाढी एकादशीच्या दिवशी आजही सिनेमा टेलिव्हिजन चॅनेलवर पाहायला मिळतो. लोक देखील हा सिनेमा उत्सुकतेने पाहतात. या चित्रपटात कोणी कोणती भूमिका साकारली? आणि या सिनेमातील मुख्य अभिनेत्री आणि बाल कलाकार विठोबाबद्दल जाणून घेऊयात.

अभिनेत्री नंदिनी जोग यांनी साकारली होती मुक्ताची भूमिका 

पंढरीची वारी (Pandharichi Vari) या सिनेमाचं दिग्दर्शन Ramakant Kavthekar यांनी केलं होतं. या सिनेमात प्रामाणिक निर्मळ मनाच्या वारकऱ्याच्या मुलीची भूमिका अभिनेत्री नंदिनी जोग हिने साकारली होती. तिला या सिनेमात 'मुक्ता' म्हटलं गेलं होतं.  अभिनेत्री नंदिनी जोग यांनी मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र, त्यांची पंढरीची वारी या सिनेमातील भूमिका आज देखील चर्चत असते. नंदिनी जोग या मूळच्या अकोला जिल्ह्यातील आहेत. मात्र, त्यांनी बऱ्याच वर्षांपासून सिनेक्षेत्रापासून दूर आहेत. लग्नानंतर त्यांनी पुण्यात राहण्याचा निर्णय घेतलाय. 

विठोबाची भूमिका साकारणारा अभिनेता कोण होता? 

चित्रपटातील एक चिमुकला मुलगा, जो मुका असूनही आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकतो. चित्रपटाच्या शेवटी त्याचे विठोबाचे रूप उलगडते. बकुल कवठेकर हे 'पंढरीची वारी' या मराठी चित्रपटात विठोबाची भूमिका साकारलेल्या बालकलाकाराचे नाव आहे. बकुल कवठेकर हा या सिनेमाचे दिग्दर्शक Ramakant Kavthekar यांचा मुलगा... मात्र, पुण्यात शिक्षण घेत असताना 2002 मध्ये त्यांचं निधन झालं होतं. 

बाळ धुरी यांनी निभावली अण्णाची भूमिका

प्रामाणिक वारकरी दाखवण्यात आलेल्या वारकऱ्याची म्हणजेच अण्णाची भूमिका बाळ धुरी यांनी निभावली होती. या सिनेमात अण्णा हे पात्र म्हणजे  गावातील आदर्श व्यक्तिमत्त्व, विठ्ठलभक्त आणि कुटुंबप्रमुख. मूळात ही भूमिका अरुण सरनाईक यांना देण्यात आली होती, परंतु चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या अपघाती निधनामुळे बाळ धुरी यांनी ही भूमिका साकारली.

अभिनेत्री जयश्री गडकर यांनी साकारलं 'आक्कासाहेब' हे पात्र 

अण्णांची पत्नी, बडबडी आणि विठ्ठलावर राग करणारी. मूळात ही भूमिका रंजना देशमुख यांना देण्यात आली होती, परंतु अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे जयश्री गडकर यांनी ही भूमिका साकारली.  

अशोक सराफ यांनी निभावली  सदा या चोराची भूमिका 

गावातील एक चोर, जो चोरीच्या उद्देशाने वारीच्या प्रवासात सहभागी होतो.

राजा गोसावी – नाना सदाचा साथीदार, गावातील दुसरा चोर.

चोरीच्या उद्देशाने वारीच्या प्रवासात सहभागी होतो.

राघवेंद्र काडकोळ – गणा, सदा आणि नानाचा तिसरा साथीदार.

"पंढरीची वारी" या चित्रपटात याच वारकरी संप्रदायाच्या जीवनमूल्यांचे दर्शन घडते. या सिनेमाची कथा एका साध्या ग्रामीण वारकऱ्याभोवती फिरते जो प्रत्येक वर्षी पंढरपूरची वारी करतो. त्याच्या जीवनातील संघर्ष, भक्ती, त्याचे कुटुंब, गावकऱ्यांशी असलेले नाते आणि वारीच्या माध्यमातून घडणारा आत्मिक विकास – या सगळ्याच गोष्टी सिनेमात प्रभावीपणे दाखवल्या आहेत. चित्रपटात वारीच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी, पावसात चिंब होऊनही "माऊली माऊली" म्हणत चालणारे वारकरी, त्यांच्यातील आपुलकी आणि नात्यांची गुंफण मनाला भिडते. चित्रपटात महाराष्ट्रातील मातीतून आलेले अनुभवी कलाकार आहेत. त्यांनी आपापल्या भूमिकेत प्राण ओतला आहे. दिग्दर्शकाने अत्यंत बारकाईने वारीचा अभ्यास करून तिचे वास्तववादी चित्रण केले आहे. चित्रपटात वारीचा अनुभव प्रेक्षकांना खऱ्याखुऱ्या स्वरूपात अनुभवता येतो.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऑर्डर ऑर्डर...बॉलिवूडमधील 300 सिनेमांमध्ये निभावली न्यायाधीशांची भूमिका, तर मुलगा बनला थरकाप उडवणारा खलनायक

'चला हवा येऊ द्या' पुन्हा सुरु होणार? भाऊ कदमच्या साथीला गौरव मोरेची एन्ट्री, श्रेया बुगडेने दिले मोठे संकेत