Panchayat season 5 OTT: ओटीटीच्या दुनियेत सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज म्हटलं तर पंचायत या सिरीजचं नाव नक्कीच घेतलं जातं. आतापर्यंत या मालिकेच्या चार दमदार सीझन्सनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता चाहत्यांना पाचव्या सीझनची आतुरता लागली आहे. दरम्यान, ‘पंचायत 5’च्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ही सीरिज नेमकी कधी आणि कुठे स्ट्रीम होणार, याबाबत जाणून घेऊया.

Continues below advertisement

‘पंचायत 5’ कधी रिलीज होणार?

2020 मध्ये पंचायत या वेबसीरिजची सुरुवात झाली होती. फुलेरा गावाची मनोरंजक आणि विनोदी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यानंतर मेकर्सनी दरवर्षी नवे सीझन आणत ही मालिका ओटीटीवरील सर्वाधिक लोकप्रिय शोमध्ये स्थान मिळवलं.

चौथ्या सीझनच्या मोठ्या यशानंतर आता प्रेक्षकांना पाचव्या सीझनची उत्सुकता लागली आहे. गेल्या वर्षी आलेल्या चौथ्या सीझनदरम्यान, जुलै 2026 मध्ये ‘पंचायत 5’ रिलीज होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता जुलै महिना सुरू झाला असूनही मेकर्सकडून अधिकृत रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.मात्र विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पंचायत 5’ याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये ही मालिका ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होऊ शकते, अशी चर्चा आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच मेकर्स या संदर्भात नवं अपडेट देऊ शकतात. नुकतेच या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे BTS व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Continues below advertisement

‘पंचायत 5’च्या कथेत मोठे ट्विस्ट

नव्या सीझनमध्ये फुलेरा गावात अनेक मोठे मुद्दे पाहायला मिळणार आहेत. यामध्ये सचिव जी आणि माजी प्रधान मंजू देवी यांची मुलगी रिंकी यांच्या लग्नाचा ट्रॅक दाखवला जाऊ शकतो. दुसरीकडे, उपप्रधानपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, तसेच प्रल्हाद चा आमदारकीची निवडणूक लढणार का, यासारखे अनेक प्रश्न या सीझनमध्ये उलगडणार आहेत.