Panchayat Fame Actor Vinod Suryavanshi: सिनेसृष्टीचं (Movie Industry) जग जेवढं ग्लॅमरस आणि झगमगतं दिसतं, तेवढीच अंधारानं माखलेली त्याची दुसरी बाजू असते. आजवर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी (Bollywiid Actress) सांगितलेल्या भयाण अनुभवांवरुन याची प्रचिती येतेच. आजवर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आलेल्या नको त्या अनुभवांची आपबिती सांगितली आहे. अनेकांचे अनुभव तर अंगावर काटा आणणारेच होते. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एका अभिनेत्यानं त्याला आलेल्या विचित्र अनुभवांबाबत जाहीरपणे सांगितलंय. अभिनेत्याला आलेले अनुभव फारच धक्कादायक आणि हादरवणारे आहेत. 

'पंचायत' (Panchayat) फेम अभिनेता विनोद सूर्यवंशी (Vinod Suryavanshi), ज्यानं फक्त एक छोटीशी भूमिका साकारुन आपली दमदार छाप सोडली. पण, कधीकाळी त्याला जातीयवाद (Casteism), वर्णभेद यांसारख्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. पंचायत या लोकप्रिय मालिकेत छोट्याशा भूमिकेतूनही ठसा उमटवणारा अभिनेता विनोद सूर्यवंशी याने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या मूळ गावी अनुभवलेल्या जातीय भेदभावाबद्दल जाहीरपणे सांगितलं. सिक्युरिटी गार्डपासून ते ज्युनिअर आर्टिस्ट आणि पुढे मोठ्या प्रोजेक्ट्सपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास खूप संघर्षमय राहिलाय. अभिनेत्यानं बोलताना असाही आरोप केलाय की, त्याच्या दिसण्यामुळे, त्याच्या रंगामुळे त्याला अनेकदा इंडस्ट्रीत नाकारण्यात आलंय. 

Vinod Suryavanshi Faced Casteism: हॉटेलमध्ये जेवल्यानंतर स्वतःच आपली ताटं धुवावी लागलेली... : विनोद सूर्यवंशी

सिद्धार्थ कन्ननच्या (Siddharth Kannan) पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनेता विनोद म्हणाला की, कर्नाटकातील त्याच्या गावात आजही जातीय भेदभाव प्रकर्षानं जाणवतो. गावात उच्चवर्णीय आणि खालच्या जातींसाठी स्वतंत्र वस्ती आहे. दलितांची वस्ती मुख्य गावापासून वेगळी ठेवण्यात आलीय. लहानपणी वडिलांसोबत गावाला गेल्यावर त्याला एक कटू अनुभव आला होता, हॉटेलमध्ये जेवल्यानंतर त्यांना स्वतःच आपली ताटं धुवावी लागलेली आणि त्यासाठी पैसेही द्यावे लागलेले. इतकंच नव्हे, तर आजही त्या गावात असं एक मंदिर आहे, जिथे त्यांना प्रवेश दिला जात नाही.

"मला वर्णामुळे अनेकदा रिजेक्ट करण्यात आलं..." (Vinod Suryavanshi Struggle Life)

अभिनेता विनोद सूर्यवंशी यानं सांगितलं की, त्याला त्याच्या वर्णामुळे कित्येकता रिजेक्ट करण्यात आलेलं. अभिनेत्यानं सांगितलं की, "मला माझ्या वर्णामुळे कित्येकदा रिजेक्ट करण्यात आलेलं. जेव्हा मी टीव्हीसाठी ऑडिशन्स दिले, त्यावेळी त्यांना श्रीमंत दिसणारा चेहरा हवा असायचा. एवढंच नाहीतर, एका भिकाऱ्याच्या भूमिकेसाठीही त्यांना श्रीमंत दिसणाराच चेहरा हवा होता. मला सांगण्यात आलेलं की, मी त्यांच्या गरजेनुसार फिट बसत नाही... मला एका नोकराच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं. कास्टिंग टीमनं मला फायनल केलेलं आणि मी ठरलेल्या वेळी शूटसाठी पोहोचलोही होतो. पण, ज्यावेळी क्रिएटिव्ह डायरेक्टर आल्या, त्यावेळी त्यांनी विचारलं की, मी कोण आहे...? त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं... तर त्या म्हणाल्या की, नाही... हा नाही चालणार, आपल्याला गोऱ्या रंगाचं कुणीतरी हवंय... याचा रंग सावळा आहे... याला परत पाठवा..." 

बालपणीच्या 'त्या' कटू आठवणी (Actor Vinod Suryavanshi Childhood)

विनोद सूर्यवंशी यानं सांगितलं की, त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा परिणाम त्यांच्या बालपणावर खोलवर झाला होता. लहानपणापासूनच त्याच्या आयुष्याला दुःखाची झालर होती, त्यामुळे सण-उत्सवांमध्ये त्याला कधीच उत्साह-आनंद वाटला नाही. साजरं करण्यासारखं काहीच नसल्याची भावना त्यांना कायम त्रास देत असायची. त्याची आई घरकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची, तर वडील मिस्त्री होते. त्यांना नेहमीच काम मिळायचं, असं नाही. त्यामुळे ज्या दिवशी काम मिळायचं नाही, त्यावेळी ते दारू पिऊन घरी यायचे. माझ्या बालपणीचा काळ सुखद नव्हता. माझे वडील आईला शिवीगाळ करणं, तिला ओरडणं... अगदी मारहाणसुद्धा करायचे, हे सगळं त्यांनी लहानपणी पाहिलं. अशा वातावरणातच ते लहानाचे मोठे झाले. "मला वडिलांचा द्वेष नव्हता, पण त्यांचं वागणं मला अजिबात आवडत नव्हतं...” असंही अभिनेत्यानं सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

86 व्या वर्षात बॉलिवूड अभिनेता आर्थिक अडचणीत? व्हिडीओ व्हायरल होताच अमिताभ बच्चन मदतीसाठी धावले, पत्नी म्हणाली...