Palash Muchhal Video Natasa Stankovic: भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या रिलेशनशिपच्या आणि त्यानंतर लग्नाच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होत्या. ठरल्याप्रमाणे दोघांच्या लग्नापूर्वीचे सर्व सोहळे पार पडले, पण बोहोल्यावर चढण्यापूर्वीच काहीतरी घडलं आणि लग्न पुढे ढकललं. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांच्या आजारपणामुळे लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं. पण, नंतर मात्र पलाश मुच्छलचे फ्लर्टी चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आलं. दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचंही बोललं जातंय. तसेच, सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जातायत. अशातच आता पलाश मुच्छलचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पलाश मुच्छलचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हार्दिक पांड्याची एक्स गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविकसोबत दिसतोय. व्हिडीओमध्ये तो नताशासोबत कारमध्ये दिसतोय. हा व्हिडीओ पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
पलाश, नताशाचा कारमधला 'तो' VIDEO व्हायरल
पलाश, नताशाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पलाश मुच्छल नताशासोबत कारमध्ये दिसतोय. व्हिडीओमध्ये पलाश आणि नताशा बादशाहच्या रॅपवर एक रिल बनवतायत. व्हिडीओमध्ये दिसतंय की, पलाश, नताशासोबत कारच्या मागच्या सीटवर बसलाय. तर बादशाहचं रॅप लावून दोघेही रिल शूट करतायत.
मिडिया रिपोर्टनुसार, पलाश आणि नताशाचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. त्यावेळी हार्दिक आणि नताशाचं लग्नही झालेलं नव्हतं. दरम्यान, अद्याप या व्हिडीओबाबत पलाश किंवा नताशा दोघांपैकी कुणीच काही बोललेलं नाही.
लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाशची आई काय म्हणालेली?
पलाशच्या आईनं लग्न आणि फसवणुकीबद्दल उघडपणे सांगितलेलं. तिनं सांगितलेलं की, स्मृती आणि पलाशच्या लग्नात कोणतीही फसवणूक झालेली नाही आणि स्मृती मुच्छल कुटुंबाची सून बनण्यास तयार आहे. पलाशची आई म्हणालेली की, "यात कोणतीही फसवणूक झाली नाही. स्मृती मंधाना मुच्छल कुटुंबाची सून होईल..."
पलाशनं स्मृतीला फसवलं? (Smriti Mandhana And Palash Muchhal Wedding)
पलाश मुच्छलच्या चॅटचे स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आधीच्या डेटिंगच्या अफवा आणि रिलेशनशिप्सबाबतही चर्चांना उधाण आलं आहे. स्मृतीसोबतच्या रिलेशनशिपच्या आधी आणि नंतरही पलाशचं नाव अनेक मुलींसोबत जोडलं गेल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच काय तर, त्यानं त्या मुलींनाही सेम टू सेम स्मृतीसारखंच गुडघ्यावर बसून अंगठी देऊन प्रपोज केल्याचं बोललं जात आहे. पलाशनं आतापर्यंत किती मुलींना डेट केलंय? याचा कच्चाचिठ्ठाच नेटकऱ्यांनी बाहेर काढलाय. हे सर्व पाहून अनेकांना धक्का बसलाय. तसेच, आता या सर्व प्रकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. अनेकांनी पलाशची बाजू घेतलीय, तर अनेकांनी स्मृती मानधनाला सहानुभूती देऊन पलाशपासून दूर राहण्याचाच सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :