Smriti Mandhana Palash Muchhal: गेल्या काही दिवसांपासून भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छलच्या (Palash Muchhal) लग्नाच्या चर्चांनी जोर धरलेला. लग्नापूर्वीच्या सोहळ्यांचे फोटोही व्हायरल झालेले. पण, अचानक लग्नाच्या एक दिवस आधी स्मृती मानधना आणि पलाशचं (Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Cancel) लग्न पुढे ढकलल्याचं समोर आलं आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. चाहते स्मृती आणि पलाशच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहत होते. पण, अचानक लग्न पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीचं कारण समोर आलं, पण त्यानंतर पलाशच्या फ्लर्टी चॅट्सचे काही स्क्रिनशॉर्ट्स व्हायरल झाले. मेरी डिकॉस्टा (Mary D'Costa) नावाच्या तरुणीसोबतच्या चॅट्सचे स्क्रिनशॉर्ट व्हायरल झालेले.
स्मृती मानधना आणि पलाश मु्च्छलचं लग्न पुढे ढकलल्याचं सर्वांसमोर आलं आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं. सर्वात आधी स्मृतीच्या वडिलांची तब्येत खालावल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं गेलं. पण, त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलचे मेरी डिकॉस्टा नावाच्या तरुणीसोबतचे काही चॅट्स व्हायरल झाले आणि पलाशनं स्मृतीला धोका दिला असल्याचं बोललं जाऊ लागलं. पण अशातच आता मेरी डिकॉस्टाच्या नावाचं एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मेरीनं मी पलाशला कधीच भेटले नसल्याचं सांगतेय. भेट झाली नसतानाही पलाशने मेरीला डीएम का केला? स्मृती मानधनाशी रिलेशनशिपमध्ये असतानाही तिच्याशी का फ्लर्ट करत होता? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.
मेरी डिकोस्टाच्या नावानं व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
मेरी डिकोस्टाच्या नावानं व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "मी तीच व्यक्ती आहे, जिनं चॅट्स पोस्ट केले होते आणि मला कधीच माझी ओळख उघड करायची नव्हती... पण आता मला काही गोष्टी स्पष्ट करायच्यात... जे चॅट्स मी पोस्ट केलेत, ते मे आणि जुलै 2025 दरम्यानचे आहेत. हे चॅटिंग फक्त महिनाभरच सुरू होतं... मी त्याला कधीच भेटले नाही... तसेच, अनेकजण मला विचारतायत की, हे मी आधीही करू शकले असते किंवा हे मला आत्ताच करायची काय गरज होती? तर मला त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा होता, तो कोण आहे, हे मला सर्वांना सांगायचं होतं... मला क्रिकेट आवडतं, आणि मी स्मृती मानधनाचा खूप आदर करते, आणि त्यामुळेच मला सत्य सर्वांसमोर आणायचं होतं... लोक विचार करतायत की, मी कोरिओग्राफर आहे, पण मी कोरिओग्राफर नाही... ज्या व्यक्तीसोबत पलाशनं स्मृतीची फसवणूक केलीय, ती व्यक्ती मी नाही... मला हे माहीत नव्हतं की, हे सर्व माझ्याविरोधात अशा प्रकारे जाईल, जेणेकरुन मला माझं अकाउंट प्रायव्हेट करावं लागेल... माझा असा कोणताही हेतू नव्हता..."
चॅट्समध्ये नेमकं काय?
मे 2025 च्या एका मेसेजमध्ये पलाश मुच्छल मेरी डिकोस्टाला एकत्र पोहायला जाण्यासंदर्भात सांगतोय. पण, त्यावेळी मेरी तू रिलेशनमध्ये असण्याबाबत विचारते. त्यावेळी मात्र पलाश मेरीचा प्रश्न टाळतो. मेरी डिकोस्टाला स्पष्ट उत्तर देण्याऐवजी तो, तिला इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये गुंतवून तिचा होकार मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. या चॅट्समुळेच स्मृती आणि पलाश यांच्या नात्यात तिढा निर्माण झाल्याचं बोललं जातंय. स्मृती आणि पलाशचं लग्न पुढे ढकल्याच्या घोषणेनंतर स्मृतीनं प्रीवेडिंग, लग्नापूर्वीच्या सर्व सोहळ्यांचे फोटो सोशल मीडियावरुन डिलिट केलेत. यामुळे पलाश स्मृतीला फसवत असल्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगलीय. लग्नाबाबत स्मृती किंवा पलाशकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :