Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतानं (India Pakistan) पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. पाकिस्तानसोबतचा सिंधु जल करार स्थगित (Indus Water Treaty Suspended) करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना भारत सोडण्यासाठी 48 तासांचा अवधी देण्यात आलाय. तसंच अटारी वाघा बॉर्डर (Attari - Wagah Border) पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. अशातच,  या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही (Bollywood Celebrity) या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि बदला घेण्याची मागणीही केली. त्याचप्रमाणे, उशीरा का होईना, पाकिस्तानी कलाकारांनी (Pakistani Celebrity) या हल्ल्यावर आसवं गाळली असून हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून ओळखली जाणारी हानिया आमिरनं काय म्हणाली? 

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरनं (Hania Aamir) लिहिलंय की, "कुठेही घडलेली कोणतीही दुर्घटना ही आपल्या सर्वांसाठी एक दुर्दैवी घटना असते. अलिकडच्या हल्ल्यात प्रभावित झालेल्या निष्पाप लोकांसोबत माझ्या संवेदना आहेत. आपण दुःखात आणि आशेत एकत्र आहोत. जेव्हा निष्पाप लोक आपले प्राण गमावतात, तेव्हा ते दुःख फक्त त्यांचं नसतं, तर ते आपल्या सर्वांचं असतं. आपण कुठून आलो आहोत, हे महत्त्वाचं नाही. दुःखाची फक्त एकच भाषा असते."

फवाद खान काय म्हणाला? 

बॉलिवूड डेब्यू केलेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननं (Fawad Khan) लिहिलंय की, "पहलगाममधील भयानक हल्ल्याच्या बातमीनं दुःख झालं. या भयानक घटनेतील बळींसोबत आमचे विचार आणि प्रार्थना आहेत. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबाला शक्ती आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो." 

फवाद खान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. 'अबीर गुलाल' या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर देखील आहे. हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. या हल्ल्यानंतर लोक संतप्त आहेत आणि त्यांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ नये, अशी मागणी करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

तर हानिया आमिर एका पंजाबी चित्रपटात दिसणार होती. ती दिलजीत दोसांझसोबत 'सरदार जी 3' चित्रपटात दिसणार होती. पण, आता हासुद्धा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. 

दहशतवाद निषेधार्ह... : ओसामा खान

अभिनेता ओसामा खाननं लिहिलंय की, "पहलगाममधील पीडितांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना. या कठीण काळात त्यांना बळ मिळो. दहशतवाद कुठेही घडला तरी तो निषेधार्ह आहे, मग तो पाकिस्तानात असो, भारतात असो किंवा इतर कुठेही असो. आपण या निरर्थक हिंसाचाराच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सुन्न नवविवाहिता लेफ्टनंट पतीच्या मृतदेहाजवळ, फोटो पाहून आख्खा देश हळहळला, सलमान खान म्हणाला, पुरी कायनात को....