Celebs On Pahalgam Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं देश हादरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे आणि त्याव्यतिरिक्त अनेक लोक जखमी झाले आहेत. पहलगाममधील या वेदनादायक हल्ल्यानं बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतच्या स्टार्सना धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत, सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहुयात कोणी काय प्रतिक्रिया दिली ते सविस्तर... 

Continues below advertisement

संजय दत्त (Sunjay Dutt)

संजय दत्तनं त्याच्या एक्स अकाउंटवरून ट्वीट केलं की, त्यांनी आमच्या लोकांना निर्घृणपणे मारलंय. हे माफ करता येणार नाही. या दहशतवाद्यांना हे कळलं पाहिजे की, आपण गप्प बसणार नाही. आपल्याला याचं योग्य उत्तर द्यावंच लागेल. मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंहजी यांना विनंती करतो की, त्यांनी योग्य ती शिक्षा द्यावी.

अजय देवगण (Ajay Devgn)

अभिनेता अजय देवगणनंही पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलंय आणि म्हटलंय की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून मला खूप दुःख आणि धक्का बसला आहे. या घटनेचे बळी ठरलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय, ते सर्व निर्दोष होते. जे घडलं ते हृदयद्रावक आणि पूर्णपणे अमानवी आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत.

सोनू सूद (Sonu Sood)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये त्यानं लिहिलंय की, "काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. सुसंस्कृत जगात दहशतवादाला स्थान नसावं आणि हे भ्याड कृत्य अस्वीकार्य आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी मी प्रार्थना करतो."

अक्षय कुमार (Akshay Kumar)

अक्षय कुमारनं इंस्टाग्रामवर पोस्ट करून पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेत्यानं लिहिलंय की, "ही बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणं, हे घोर पाप आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करतो."

अनुपम खेर (Anupam Kher)

अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. यासोबत त्यांनी लिहिलंय की, "चुकीचं, चुकीचं, चुकीचं. पहलगाम हत्याकांड!! आज शब्द शक्तिहीन झालेत."

गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary)

गुरमीत चौधरी यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, "हृदयद्रावक घटना. शांतता आणि सौंदर्यासाठी असलेल्या ठिकाणी पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं. पीडितांसाठी प्रार्थना."

मनोज मुंतशीर (Manoj Muntashir)

मनोज मुंतशीर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, "दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, दहशतवादी हिंदू किंवा मुस्लिम नसतो, तो फक्त एक दहशतवादी असतो. हे देवा, पुढच्या जन्मात मला लांडगा बनव म्हणजे, मी अशा गोष्टी बोलणाऱ्या बुद्धिजीवींचे चेहरे फाडू शकेन."

आम्रपाली दुबे (Amrapali Dubey)

भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिनंही या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे आणि न्यायाची मागणी केली आहे. इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करताना अभिनेत्रीनं लिहिलंय की, "आपण आपल्याच देशात किती काळ भीतीनं जगणार आहोत... ते पर्यटक होते. हे खूप दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळाला पाहिजे."

रवि किशन (Ravi Kishan)

रवि किशन यांनी त्यांच्या एक्स वरील पोस्टमध्ये लिहिलंय की, "त्यांनी राज्याबद्दल विचारलं नाही, त्यांनी भाषेबद्दल विचारलं नाही, त्यांनी जातीबद्दल विचारलं नाही, त्यांनी धर्माबद्दल विचारलं..."

हिना खान (Hina Khan)

हिना खाननंही इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट पोस्ट केली आहे. अभिनेत्रीनं लिहिलंय की, "पहलगाम, का, का का...?"

शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim)

टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिम पत्नी दीपिका कक्कर आणि मुलगा रुहानसोबत सुट्टीसाठी काश्मीरला गेला होता. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर, अभिनेत्यानं चाहत्यांना एक अपडेट दिलंय की, "तो हल्ल्यापूर्वीच काश्मीर सोडून परतण्यासाठी निघाला होता."

इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करताना त्यानं लिहिलंय की, "नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वजण आमच्यासाठी काळजीत आहात. आम्ही सर्व सुरक्षित आणि ठीक आहोत. आम्ही आज सकाळी काश्मीर सोडलं आणि दिल्लीला सुखरूप पोहोचलो. तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार. लवकरच नवीन व्लॉग येत आहे..." 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pahalgam Terror Attack  : तुम्ही मोदींना डोक्यावर चढवलंय असं म्हणत माझ्या डोळ्यासमोर वडिलांना, काकांना गोळ्या घातल्या; जखमी झालेल्या असावरी जगदाळेंनी काय सांगितलं?