padmini kolhapure : पद्मिनी कोल्हापुरी लहानपणापासूनच राज कपूर यांच्यासोबत काम करत होत्या. शशि कपूर आणि जीनत अमान यांच्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. पुढे मोठ्या झाल्यावर त्यांनी प्रेम रोग या चित्रपटात राज कपूर यांच्यासोबत मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. मात्र, 1985 मध्ये आलेल्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी त्यांनी नकार दिला होता. या चित्रपटाची संकल्पना आणि किसिंग सीनची मागणी पाहून पद्मिनी म्हणाल्या, "अंकल, मी हे करू शकत नाही."

1982 साली राज कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरी यांना घेऊन प्रेम रोग हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटातील पद्मिनी यांची निरागसता आणि जबरदस्त अभिनय पाहून राज कपूर खूप प्रभावित झाले होते. त्यांना ठाम वाटले होते की, भविष्यात ते पुन्हा पद्मिनीसोबत काम करतील. या चित्रपटात पद्मिनी आणि ऋषी कपूर यांची जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती. चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आणि त्याचे गाणेही प्रचंड गाजले. विधवा स्त्रीची भूमिका साकारून पद्मिनी यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि त्या त्या काळातील टॉप अभिनेत्री बनल्या.

1985 मध्ये राज कपूर यांनी राम तेरी गंगा मैली हा चित्रपट बनवला. चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर यशाचे झेंडे फडकवले. मात्र या चित्रपटातील काही बोल्ड सीनमुळे प्रेक्षक चकित झाले. अनेकांना डोळे झाकावे लागले, इतके बोल्ड सीन चित्रपटात होते. त्यामुळे चित्रपटावर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले. पण मंदाकिनीला या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. एका रात्रीत ती स्टार बनली. मात्र या भूमिकेसाठी राज कपूर यांची पहिली पसंती मंदाकिनी नव्हती, ते ही भूमिका पद्मिनी कोल्हापुरी यांना देऊ इच्छित होते.

"मी हे करू शकत नाही अंकल..." पद्मिनी कोल्हापुरी आणि राज कपूर यांच्यात अतिशय चांगले संबंध होते. त्यामुळे राज कपूर यांना वाटले की पद्मिनी या चित्रपटासाठी नकार देणार नाहीत. मात्र जेव्हा त्यांनी चित्रपटाबद्दल सांगितले आणि किसिंग सीनचा उल्लेख केला, तेव्हा पद्मिनींनी नकार दिला. राजश्री अनप्लग्ड या कार्यक्रमात दिलेल्या एका मुलाखतीत पद्मिनींनी स्वतः याचे खुलासे केले. त्यांनी सांगितले की, "जेव्हा राज अंकल यांनी मला चित्रपटाबद्दल सांगितले, तेव्हा त्यात एक किसिंग सीन होता. मी कधीच असे रोल केले नव्हते, त्यामुळे मला तो सीन करायचा नव्हता. राजीव कपूरसोबत काम करण्यात मला काही अडचण नव्हती, पण स्क्रीनवर किस करणं मला योग्य वाटत नव्हतं. म्हणून मी तो चित्रपट नाकारला."

हेही लक्षात घ्यावे की राम तेरी गंगा मैली मध्ये राज कपूर यांचे सुपुत्र राजीव कपूर प्रमुख भूमिकेत होते. मंदाकिनीसोबत त्यांची जोडी चांगलीच गाजली होती. पद्मिनींनी सांगितले की, "चित्रपटाचे 45 दिवसांचे शूटिंग झाल्यानंतरही राजजी म्हणाले की अजूनही तू या चित्रपटात काम करू शकतेस. पण मी स्पष्ट सांगितले – अंकल, मला माफ करा, मी हे करू शकत नाही."

इतर महत्त्वाच्या बातम्या

मला मुस्लिमांबद्दल खूप प्रेम, पाकिस्तानातून रोज यायचे 50 लेटर; अभिनेत्रीपासून साध्वी बनलेल्या ममता कुलकर्णीचं वक्तव्य