Web Series: गेल्या वर्षी OTT वर रिलीज झालेल्या एका वेबसीरिजने प्रेक्षकांची जोरदार वाहवा मिळवली होती. मात्र, सीरिज हिट ठरूनही तिच्या मुख्य अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता या सीरिजचा दुसरा सीझन येणार असून, त्यामध्ये ही अभिनेत्री दिसणार नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एका देखण्या तरुण राजकुमाराची आणि भारतातील पहिलं लक्झरी हॉटेल चालवणाऱ्या महत्त्वाकांक्षी तरुणीची ही कथा होती. एका बाजूला राजघराण्यातील वैयक्तिक संघर्ष आणि कौटुंबिक गुंतागुंत, तर दुसऱ्या बाजूला स्वतःचा हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप उभा करणारी स्मार्ट, फॅशन-फॉरवर्ड CEO… या दोघांच्या प्रेमकथेवर आधारित ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Continues below advertisement

बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्रीचं ट्रोलिंग

ही सीरिज म्हणजे ईशान खट्टर आणि भूमी पेडणेकर स्टारर 'द रॉयल्स ' गेल्या वर्षी रिलीज झालेल्या या सीरिजमधील भूमीच्या अभिनयावर अनेकांनी टीका केली होती. विशेषतः तिच्या कॅरेक्टर आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झालं होतं. आता,‘ द रॉयल्स सिझन 2’ मधून भूमी पेडणेकर बाहेर पडणार असल्याचं समोर येत आहे. मेकर्स कथेला वेगळं वळण देण्याच्या तयारीत असून, दुसरा सीझन मुख्यतः राजघराणं आणि महालातील अंतर्गत संघर्षांवर आधारित असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ट्रोलिंगमुळे घेतला ब्रेक

भूमी पेडणेकरने याआधी एका मुलाखतीत या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं होतं. तिनं सांगितलं की, ‘The Royals’ रिलीज झाल्यानंतर झालेल्या टीका आणि ट्रोलिंगचा तिच्यावर मानसिक परिणाम झाला होता. त्यामुळे तिला अभिनयातून तब्बल नऊ महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला. काही टीका खूप खालच्या पातळीवर झाल्या होत्या, पण काही प्रतिक्रियांमुळे स्वतःच्या निर्णयांवर पुन्हा विचार करण्याची संधी मिळाल्याचंही तिनं म्हटलं होतं.

Continues below advertisement

प्रियंका घोष आणि नूपुर अस्थाना निर्मित, तर नेहा वीणा शर्मा लिखित ‘ द रॉयल्स’ ही सीरिज एका राजघराण्याची कथा सांगते, जे आपला वारसाहक्काचा महाल लक्झरी रिसॉर्टमध्ये बदलून पुन्हा वैभव मिळवण्याचा प्रयत्न करत असतं. या सीरिजमध्ये साक्षी तंवर, नोरा फतेही, विहान समत, डिनो मोरिया आणि मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

भूमीचे आगामी प्रोजेक्ट्स

दरम्यान, भूमी आता अधिक गंभीर आणि डार्क कथानक असलेल्या प्रोजेक्ट्सकडे वळत आहे. ती लवकरच एका कोर्टरूम ड्रामामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. तसेच ‘दलदल 2’ या सीक्वलमध्येही ती काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.