OTT webseries: OTT प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरिज (Web Series) येतात आणि काही काळातच प्रेक्षकांच्या विस्मरणातही जातात. मात्र, काही सीरिज अशा असतात ज्या पहिल्याच सीझनमध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अशाच एका भन्नाट वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची चाहते गेल्या 3 वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. OTTवरील लोकप्रिय वेब सीरिजबद्दल आपण सातत्याने माहिती घेत असतो. विशेषतः अशा सीरिजबद्दल, ज्यांच्या नव्या सीझनची प्रेक्षक वर्षानुवर्षे वाट पाहत आहेत आणि ज्यांनी पहिल्याच सीझनमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.आज आपण अशाच एका वेब सीरिजबद्दल जाणून घेणार आहोत. या सीरिजचा पहिला सीझन तब्बल 3 वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला होता. प्रेक्षकांना ही सीरिज प्रचंड आवडली आणि तेव्हापासून चाहते तिच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत.

Continues below advertisement

कोणती वेबसिरीज आहे?

ज्या वेब सीरिजबद्दल बोलत आहोत, तिचा आतापर्यंत फक्त एकच सीझन रिलीज झाला आहे. 2023 मध्ये नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झालेली ही एक डार्क कॉमेडी थ्रिलर सीरिज आहे. क्राइमसोबतच भन्नाट पंचलाइन आणि मजेशीर प्रसंगांमुळे या सीरिजची कथा आणखी रंजक बनते.चला, आता तुमचा सस्पेन्स संपवूया. ही वेब सीरिज म्हणजे ‘गन्स अँड गुलाब्स’ (Guns & Gulaabs).राजकुमार राव, दुलकर सलमान आणि गुलशन देवैया यांसारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेली ‘गन्स अँड गुलाब्स’ ही मस्ट-वॉच सीरिज मानली जाते. पहिल्याच सीझनमध्ये या सीरिजने OTTवर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.नेटफ्लिक्सच्या टॉप-10 सीरिजच्या यादीतही ‘गन्स अँड गुलाब्स’चा समावेश झाला होता. त्यामुळे पहिल्या सीझनला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर मेकर्सनी लगेचच ‘गन्स अँड गुलाब्स सीझन 2’ची अधिकृत घोषणा केली होती.

3 वर्षांपासून सिझन 2ची प्रतीक्षा

मात्र, घोषणा होऊन बराच काळ उलटला तरी ‘गन्स अँड गुलाब्स 2’बाबत अद्याप कोणतंही मोठं अपडेट समोर आलेलं नाही. त्यामुळे या सीरिजच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.फॅन्स गेल्या तीन वर्षांपासून दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. भविष्यात ‘गन्स अँड गुलाब्स 2’ नेटफ्लिक्सवरच स्ट्रीम होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

7 एपिसोडची भन्नाट कथा

‘गन्स अँड गुलाब्स’चा पहिला सीझन 7 एपिसोडमध्ये विभागलेला आहे. या प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या पात्रांची स्वतःची एक कथा पाहायला मिळते. सुरुवातीला या कथा वेगवेगळ्या वाटतात; मात्र सीरिजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये ही सगळी पात्रं आणि त्यांच्या कथा एकमेकांशी जोडल्या जातात.याचमुळे सीरिजचा शेवट आणखी रंजक आणि थरारक होतो. क्राइम, डार्क कॉमेडी, भन्नाट संवाद आणि दमदार कलाकारांचा अभिनय यामुळे ‘गन्स अँड गुलाब्स’ने पहिल्याच सीझनमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली.