Romantic Thriller webseries: ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या एका चार एपिसोडच्या एका रोमँटिक थ्रिलर सिरिजचा (Romantic Thriller Series) जबरदस्त बोलबाला पाहायला मिळत आहे. या मालिकेने ‘धुरंधर 2’लाही मागे टाकत नंबर या सिरिजने ट्रेंडिंगच्या शर्यतीत पहिलं स्थान पटकावलं आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांतच या मालिकेने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. या  सिरिजचे नाव 'ठुकरा के मेरा प्यार' असं आहे. या मालिकेचा पहिला सीझन 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला होता. जवळपास दीड वर्षांपासून प्रेक्षक दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 19 जूनपासून हा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेला केवळ प्रेक्षकांचंच प्रेम मिळालं नाही, तर IMDb वरही तगडी 8.2 रेटिंग मिळाली आहे. सध्या ही मालिका ओटीटी ट्रेंडिंग यादीत अव्वल आहे.

Continues below advertisement

धुरंधर 2 सह अनेक बिग बजेट फिल्म्सला टाकलं मागे

विशेष म्हणजे, या चार भागांच्या सिरिजने धुरंधर 2, लाफ्टर शेफ , 24 आणि जॉली  LLB 2 यांसारख्या लोकप्रिय शो आणि चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. या मालिकेचा पहिला सीझन 2024 मध्ये एकूण 19 भागांसह तीन टप्प्यांत प्रदर्शित झाला होता. प्रेम, फसवणूक, राजकारण आणि सूड या भावनांभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. सध्या जिओ हॉटस्टारवर ‘ठुकरा के मेरा प्यार सीझन 2’ पाहता येऊ शकतो. 

काय आहे कथानक? 

'ठुकराके मेरा प्यार' या नव्या सिझनची थिम शान्विका चौहान आणि कुलदीप नायर यांच्या आयुष्यातील पुढचा प्रवास दाखवते. त्यांच्या नात्यात प्रेम, विश्वासघात, पश्चाताप, सूडाची आग असे अनेक चढउतार येतात. नवीन गोष्ट वैयक्तिक शत्रूत्वाकडून राजकीय संघर्षाकडे वळते. हा सीझन मध्ये अनेक भावनिक ट्विस्ट देण्यात आले आहेत. यात संचिता बासू, अनिरुद्ध दवे, सुशील पांडे आणि कुलदीप कुमार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. रोमँटिक थ्रिलरची आवड असणाऱ्यांसाठी ही एक आवर्जून पाहण्यासारखी वेब सिरिज ठरत आहे.

Continues below advertisement