OTT Releases June 2026: उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत असल्या तरी मनोरंजनाची मेजवानी अजूनही सुरूच आहे. जून महिन्यात OTT प्लॅटफॉर्म्सवर एकापेक्षा एक दमदार चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. गुप्तहेरांच्या धाडसी मिशनपासून ते सिरीयल किलरच्या थरारक शोधापर्यंत, तर कौटुंबिक नात्यांच्या गोड-तिखट कहाण्यांपर्यंत सर्व काही या महिन्यात पाहायला मिळणार आहे. रणवीर सिंगचा बहुचर्चित धुरंधर: द रिव्हेंज सह अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्स, चर्चेत असलेल्या वेब सीरिज आणि प्रेक्षकांच्या आवडत्या फ्रँचायझींचे नवे भाग या महिन्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहेत. त्यामुळे विकेंड असो किंवा मोकळा वेळ, मनोरंजनाची कमतरता भासणार नाही. (OTT Movies Webseries 2026)

Continues below advertisement

(Dhurandhar 2) धुरंधर: द रिव्हेंज

कुठे पाहता येईल? -जिओहॉटस्टाररिलीज: 4 जून

आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय-थ्रिलरमध्ये रणवीर सिंग हमजा अली मझारी आणि जसकीरत सिंग रंगी या भूमिकांमध्ये दिसणार आहे. पहिल्या भागात लियारीचा डॉन रेहमान डकैत (अक्षय खन्ना) याचा खात्मा केल्यानंतर तो आता कराचीतील दहशतवादी गुन्हेगारी नेटवर्कमध्ये घुसखोरी करण्याच्या मिशनवर निघाला आहे.

Continues below advertisement

(Made In India A Titan Story)मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी

कुठे पाहता येईल? - ॲमेझॉन प्राइम व्हिडिओरिलीज: 3 जून

या पीरियड ड्रामामध्ये नसीरुद्दीन शाह यांनी जे.आर.डी. टाटा यांची भूमिका साकारली आहे, तर जिम सर्भ झेरक्सेस देसाई यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 1970 आणि 80 च्या दशकातील भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा झेरक्सेस देसाई यांनी जे.आर.डी. टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली टायटन ब्रँड उभारण्यासाठी केलेल्या संघर्षाची गोष्ट आहे.

(Maa Behen) माँ बहन

कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्सरिलीज तारीख: 4 जून

माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि जर्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या क्राइम-कॉमेडीमध्ये एक आई आणि तिच्या मुलीभोवती फिरणारी भन्नाट कथा पाहायला मिळणार आहे.

(Gullak Season 5) गुल्लक सीझन 5

कुठे पाहता येईल? - सोनी लिव्हरिलीज तारीख: 5 जून

प्रेक्षकांची आवडती मिश्रा कुटुंबाची कथा नव्या सीझनसह परतत आहे. नवीन स्वप्ने, वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि छोट्या शहरातील दैनंदिन आयुष्यातील गमती-जमती या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहेत. मिश्रा कुटुंब पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

(Patriot) पॅट्रियट

कुठे पाहता येईल? -ZEE5रिलीज तारीख: 5 जून

महेश नारायणम दिग्दर्शित या मल्याळम अ‍ॅक्शन-थ्रिलरमध्ये ममूटी, मोहनलाल, फहाद फासिल यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत. सरकारी संरक्षण यंत्रणेतील स्पायवेअरचा गैरवापर करून सामान्य नागरिकांवर नजर ठेवणाऱ्या राजकारणी आणि उद्योगपतींचा पर्दाफाश करण्यासाठी एक संरक्षण तज्ज्ञ आणि माजी JAG अधिकारी संघर्ष करताना दिसतो.

 (Brown) ब्राउन

कुठे पाहता येईल? ZEE5रिलीज तारीख: 5 जून

करिश्मा कपूर एका मद्याच्या व्यसनाशी झुंज देणाऱ्या गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. सिरीयल किलरचा शोध घेताना तिच्या आयुष्यातील संघर्षही उलगडत जातात.कोलकात्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या थ्रिलरमध्ये वैयक्तिक समस्यांशी झुंज देत असतानाच ती एका सिरीयल किलरचा शोध घेत असल्याची कथा यात दाखवण्यात आली आहे.

(Avatar Fire And Ash) अवतार: फायर अँड ॲश

कुठे पाहता येईल? जिओहॉटस्टाररिलीज तारीख: 24 जून

जेम्स कॅमेरॉन यांच्या ‘अवतार’ मालिकेतील तिसऱ्या चित्रपटात पँडोरावरील संघर्ष अधिक तीव्र झालेला दिसणार आहे. जेक आणि नेयतिरी यांच्या कुटुंबासमोर नव्या आणि आक्रमक नावी जमातीचे आव्हान उभे राहते.

(The Bear Season 5) द बेअर सीझन 5

कुठे पाहता येईल? डिस्नी+ हॉटस्टाररिलीज तारीख: 25 जून

हा प्रचंड लोकप्रिय वेब सिरिजचा पाचवा आणि अंतिम सीझन आहे. कार्मी रेस्टॉरंटपासून दूर जाऊन स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर सिडनी, रिची आणि नताली यांच्यावर रेस्टॉरंटची जबाबदारी येते आणि पुढे काय घडते, हे या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.