OTT Release This Week: या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. 6 जुलै ते 12 जुलैदरम्यान विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे चित्रपट, वेबसीरिज आणि डॉक्युमेंट्री रिलीज होणार आहेत. यामध्ये राम चरणचा पेद्दी, सनी देओल आणि अक्षय खन्नाचा इक्का यांसह अनेक दमदार कलाकृतींचा समावेश आहे. त्यामुळे विकेंडला घरबसल्या विविध जॉनरचा मनोरंजनाचा आस्वाद घेता येणार आहे.

Continues below advertisement

1. पेद्दी

राम चरण आणि जान्हवी कपूर यांचा स्पोर्ट्स ड्रामा 'पेद्दी' 9 जुलैपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. सुरुवातीला ही फिल्म तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध असेल. हिंदी व्हर्जन ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

2. इक्का

सनी देओल आणि अक्षय खन्ना यांची बहुप्रतीक्षित कोर्टरूम ड्रामा फिल्म 'इक्का' 10 जुलैपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Continues below advertisement

3. लँड ऑफ फुटबॉल

ही मल्याळम डॉक्युमेंट्री सीरिज भारतातील फुटबॉलविषयीचं वेड दाखवणारी आहे. विशेषतः केरळला 'फुटबॉलची भूमी' का म्हटलं जातं, याची गोष्ट दाखवते. ही सीरिज 10 जुलैपासून जिओहॉटस्टारवर स्ट्रीम होईल.

4. परिमाला अँड कंपनी

तमिळ डार्क कॉमेडी थ्रिलर 'परिमाला अँड कंपनी' मध्ये विनोद, सस्पेन्स आणि कौटुंबिक ड्रामाचा उत्तम मिलाफ पाहायला मिळणार आहे. पांडिराज यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जयराम, संजना कृष्णमूर्ती आणि अनंतिका अनिलकुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 10 जुलैपासून झी5 वर प्रदर्शित होणार आहे.

5. बाल्टी

शेन निगमची प्रमुख भूमिका असलेला मल्याळम ॲक्शन सिनेमा 'बाल्टी' हा केरळ-तामिळनाडू सीमाभागाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. स्पोर्ट्स, गुन्हेगारी आणि भावनिक नातेसंबंधांची कथा सांगणारा हा चित्रपट 10 जुलैला सोनी लिव्हवर रिलीज होणार आहे.

6. लिटिल हाऊस ऑन द प्रेरी

लॉरा इंगल्स वाइल्डर यांच्या प्रसिद्ध पुस्तकांवर आधारित 'लिटिल हाऊस ऑन द प्रेरी' ही ऐतिहासिक ड्रामा सिरीजमध्ये 1870 ते 1890 या काळातील इंगल्स कुटुंबाचं ग्रामीण आयुष्य दाखवलंय. या मालिकेचे भाग 9 जुलैपासून नेटफ्लिक्सवर पाहता येतील. 

7. शिपरेक्ड: नाइटमेअर ॲट सी

2012 मध्ये घडलेल्या कोस्टा कॉनकोर्डिया लक्झरी क्रूझ जहाज दुर्घटनेवर आधारित ही डॉक्युमेंट्री आहे. भीषण अपघात, सहा तास चाललेलं बचावकार्य आणि 32 जणांच्या मृत्यूची संपूर्ण कहाणी यात दाखवण्यात आली आहे. ही डॉक्युमेंट्री 10 जुलैपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल.

8. 'ट्रायिंग' सीझन 5

निक्की आणि जेसन यांच्या पालक होण्याच्या प्रवासाची कथा सांगणाऱ्या 'ट्रायिंग' या लोकप्रिय मालिकेचा पाचवा सीझन 8 जुलैपासून प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. दत्तक घेण्याच्या निर्णयानंतर त्यांच्या आयुष्यात होणारे बदल या सीझनमध्ये पाहायला मिळतील.

9. अंटिल द टी-शर्ट ड्राइज

ही जपानी वेबसिरीज एका प्रकाशन संस्थेत काम करणाऱ्या 40 वर्षीय संपादिकेभोवती फिरते. तिचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू असतानाच एका अपघातानंतर तिच्या आयुष्यात मोठे बदल घडू लागतात. ही सीरिज 10 जुलैपासून नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

या आठवड्यात विविध भाषांमधील चित्रपट, वेबसीरिज आणि डॉक्युमेंट्री ओटीटीवर प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांना ॲक्शन, थ्रिलर, स्पोर्ट्स, कौटुंबिक ड्रामा आणि ऐतिहासिक कथा अशा अनेक प्रकारचा मनोरंजनाचा अनुभव घेता येणार आहे.