OTT Horror Thriller: OTT प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. मात्र, काही जुने चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून पुन्हा ट्रेंडिंगमध्ये येतात. सध्या जिओहॉटस्टारवर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला एक तेलुगू हॉरर थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. 'ईशा' (Isha) हा चित्रपट सध्या प्लॅटफॉर्मच्या टॉप-10 ट्रेंडिंग यादीत असून, भयपटप्रेमींमध्ये त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा सिनेमा तुम्हाला हिंदी भाषेतही पाहता येणार आहे.

Continues below advertisement

जिओहॉटस्टारवर ट्रेंडिंगमध्ये दिसतोय हा भयपट

हॉलिवूडचा 'इव्हिल डेड बर्न' (Evil Dead Burn) हा चित्रपट सध्या त्यातील अंगावर काटा आणणाऱ्या दृश्यांमुळे चर्चेत आहे. मात्र, त्याचवेळी दक्षिणेतील 'ईशा' या हॉरर थ्रिलरनेही OTT वर प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. थिएटरमध्ये गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता जिओहॉटस्टारवर पुन्हा लोकप्रिय ठरत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

'ईशा'ची कथा चार मित्रांभोवती फिरते. हे चौघेही भूत-प्रेत, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा आणि तांत्रिकांचा पर्दाफाश करत असतात. मात्र, त्यांच्या आयुष्यात मोठं वळण तेव्हा येतं, जेव्हा एक तांत्रिक त्यांना एका भुताटकीच्या हवेलीत संपूर्ण रात्र घालवण्याचं आव्हान देतो. सुरुवातीला हे आव्हान सहज स्वीकारणारे हे चार मित्र त्या हवेलीत पोहोचतात. पण त्यानंतर सुरू होणाऱ्या भयावह घटनांमुळे त्यांच्या आयुष्याचा चेहरामोहराच बदलून जातो. त्यानंतर नेमकं काय घडतं, याचा थरार चित्रपटात पाहायला मिळतो.

Continues below advertisement

भयपटप्रेमींसाठी परफेक्ट पर्याय

सुमारे दोन तासांचा हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. थरार, रहस्य आणि अंगावर काटा आणणारे प्रसंग यामुळे 'ईशा' हा चित्रपट हॉरर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी उत्तम पर्याय मानला जात आहे. भय आणि रोमांच यांचा अनुभव एकाच वेळी घ्यायचा असेल, तर जिओहॉटस्टारवरील हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.