OTT Crime Thriller: सध्या ओटीटीवरची वेब सिरीज म्हटलं की, 'मुसाफिर कॅफे' (Musafir Cafe) या सिरीजचं नाव अगदी प्रत्येकाच्या तोंडी येईल. नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत असलेल्या या रोमँटिक सीरीजने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. या सिरीजमधील प्रत्येक पात्राची चर्चा होत आहे. विशेषतः सुधाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वेदिका पिंटोची (Vedika Pinto). ही अभिनेत्री नेमकी कोण आहे? हिने आधी कुठली कामं केली आहेत? याचा शोध घेत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. अभिनेत्री वेदिका पिंटोच्या एका धमाकेदार क्राइम थ्रिलर चित्रपटाविषयी आपण बोलतोय. 2 तास 55 मिनिटांची अनुराग कश्यप दिग्दर्शित ही क्राईम थ्रिलर (Crime Thriller) तुम्हाला एक सेकंदही बोअर करणार नाही. यात अभिनेत्री वेदिका पिंटोची दमदार भूमिका सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट प्रदर्शित तुम्हाला पाहता येणार आहे. बॉक्स ऑफिसवर व्यावसायिकदृष्ट्या फ्लॉप ठरलेल्या या सिनेमाचं ओटीटीवर येताच नशीब पालटलं. 'मुसाफिर कॅफे' नंतर या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. चला तर जाणून घेऊया, नेमका कोणत्या चित्रपटाबद्दल आपण बोलतोय ...
प्राइम व्हिडीओवर गाजतोय हा चित्रपट
ज्या चित्रपटाबद्दल आपण बोलतोय त्या क्राईम थ्रिलरच नाव निशानची (Nishaanchi) असं आहे. गेल्या 19 सप्टेंबर 2025 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी 3' मुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठा फटका बसला. मात्र, आता ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने खऱ्या अर्थाने यश मिळवलं आहे.
2 तास 55 मिनिटांच्या या चित्रपटाची कथा दोन जुळ्या भावांभोवती फिरते. यातील एक भाऊ चतुर आणि धूर्त आहे, तर दुसरा अगदी साधा-सरळ आहे. या चतुर भावाच्या आयुष्यात एका बिनधास्त मुलीची एंट्री होते आणि हे तिघे मिळून एक गँग तयार करतात. त्यानंतर शहरात लूटमार सुरू होते.मात्र, याचदरम्यान त्यांच्या आयुष्यात एका बाहुबलीची एंट्री होते आणि तो संपूर्ण व्यवस्थेलाच हादरवून सोडतो. आता हे तिघे या बाहुबलीचा सामना कसा करतात, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा निशानची (Nishaanchi) हा चित्रपट पाहावा लागेल. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम झाला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या ठाकरे, राधिका पंटो, मोनिका पंवार, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अय्यूब यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
IMDb वर मिळाली चांगली रेटिंग
ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर निशानचीच्या यशामागे त्याची सकारात्मक IMDb रेटिंग देखील महत्त्वाची ठरत असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटाच्या रेटिंगवर नजर टाकली तर त्याला 10 पैकी 6.7 रेटिंग मिळाली आहे.
