OTT Crime Thriller: OTTवर सस्पेन्स-थ्रिलर पाहणाऱ्यांसाठी प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) एक जबरदस्त पर्याय आला आहे.सुरुवातीला साधी वाटणारी एक हत्या पुढे इतकं मोठं रहस्य उलगडते की, प्रत्येक वळणावर प्रेक्षकांचा अंदाज फसतो. कोण खुनी? हत्येमागचं कारण काय? आणि पोलिसांनाच तपास करण्यात रस नसेल तर सत्य बाहेर आणणार कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना हा सिनेमा तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून (Crime Thriller) ठेवतो. अवघ्या 2 तास 11 मिनिटांच्या या सिनेमात सस्पेन्स, थरार आणि मर्डर मिस्ट्रीचा जबरदस्त तडका आहे. त्यामुळेच सध्या OTTवर हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला आहे. ‘पाताल लोक’सारख्या चर्चेत राहिलेल्या प्रोजेक्टच्या मेकर्सकडून हा नवा इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर सध्या प्रेक्षकांना आपल्या खतरनाक कथानकामुळे खिळवून ठेवत आहे. (OTT Crime Suspense Thriller)

Continues below advertisement

हा सिनेमा नेमका आहे तरी कोणता?

मर्डर मिस्ट्री म्हटलं की डोक्यात वेगवेगळे अंदाज सुरू होतात. पण ‘बबीता सिंह रिपोर्टिंग’मध्ये (Babita Singh Reporting) तुमचे सगळे अंदाज पुढच्या क्षणी फोल ठरू शकतात. 28  ऑगस्टला Amazon Prime Video वर प्रदर्शित झालेल्या या सिनेमात बरुण सोबती आणि निमिषा सजयन मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाची कथा  एका महिला पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते. नोकरीची धावपळ, घरची जबाबदारी आणि त्यात कर्तव्य... तिचं आयुष्य व्यवस्थित सुरू असताना अचानक तिच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडते.

बालपणीच्या मित्राची रहस्यमय हत्या!

महिला पोलिसाच्या बालपणीच्या मित्राची अचानक हत्या होते. प्रकरण गंभीर असूनही स्थानिक पोलिसांकडून त्याचा तपास करण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवली जात नाही. मात्र, बबीता सिंह इथे थांबत नाही.पोलिसांनी हात आखडता घेतला असला तरी, बबीता सिंह स्वतःच या हत्येच्या तपासाला सुरुवात करते. तपास जसजसा पुढे जातो, तसतशी या प्रकरणाची गुंतागुंत वाढत जाते. संशयाची सुई कुणाकडेही वळू शकते आणि प्रत्येक नव्या माहितीमुळे आधीचा अंदाज चुकीचा ठरतो. या हत्येमागे नेमकं कोण आहे, त्यामागचं कारण काय आणि बबीता सिंह अखेर या रक्तरंजित खुनाचा  पर्दाफाश करू शकते का, हे जाणून घेण्यासाठी सिनेमा शेवटपर्यंत पाहावा लागेल.‘बबीता सिंह रिपोर्टिंग’ सध्या प्राइम व्हिडीओवरील ट्रेंडिंग सिनेमांमध्ये  आहे. त्यामुळे सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री आणि पोलिस तपासाच्या कथा आवडणाऱ्यांसाठी हा सिनेमा सध्या चांगला पर्याय ठरू शकतो.

Continues below advertisement

हा सिनेमा थ्रिलर इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा असणार आहे. अंबिका पंडित यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, अमिता व्यास यांनी लेखन केलं आहे. स्क्वाड प्रोडक्शन्सने एक्ट थ्रीसोबत मिळून सौरभ मल्होत्रा, मनुज मित्तरा आणि टीना थरवानी यांच्या निर्मितीत हा सिनेमा साकारला आहे.