Horror movie OTT: यंदा एका हॉरर फिल्मने तब्बल तीन ऑस्कर पुरस्कार पटकावत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. दमदार कथा आणि थरारक सीनमुळे ही फिल्म पाहताना अक्षरशः अंगावर काटा येतो. जर तुम्ही एखादी जबरदस्त हॉरर फिल्म शोधत असाल, तर ही ऑस्कर-विजेती फिल्म नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवी. (Horror movie)

OTT वर धुमाकूळ घालणारी ऑस्कर-विजेती फिल्म

ही फिल्म आहे फ्रँकनस्टाइन. 2025 मध्ये रिलीज झालेली ही फिल्म टॉप रेटेड हॉरर चित्रपटांपैकी एक मानली जाते. IMDb वर या चित्रपटाला 7.4 रेटिंग मिळालं आहे. सुरुवातीला या चित्रपटाचं प्रीमियर व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये करण्यात आलं होतं. त्यानंतर काही निवडक थिएटर्समध्ये रिलीज झाल्यावर आता ही फिल्म OTT वर उपलब्ध आहे.

कमी थिएटर्समध्ये रिलीज, आता OTT वर उपलब्ध

‘फ्रँकनस्टाइन’ ही फिल्म सुरुवातीला अमेरिकेतील मोजक्या थिएटर्समध्येच रिलीज झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये जगभरात OTT वर रिलीज करण्यात आली. सध्या ही फिल्म नेटफ्लिक्सवर पाहायला मिळते. 2 तास 32 मिनिटांची ही फिल्म प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

काय आहे कथानक?

ही कथा एका बुद्धिमान पण महत्त्वाकांक्षी वैज्ञानिकाची आहे. व्हिक्टर फ्रँकनस्टाइन हा मृत शरीराचे अवयव वापरून एका जीवाला पुन्हा जिवंत करतो आणि निसर्गाच्या नियमांना आव्हान देतो. मात्र, त्याच्या या प्रयोगामुळे एका राक्षसाचा जन्म होतो आणि पुढे सूड, भीती आणि विनाशाची भीषण कथा सुरू होते.

दमदार स्टारकास्ट

या चित्रपटात आयझॅक यांनी व्हिक्टर फ्रँकनस्टाइनची भूमिका साकारली आहे, तर जेकब एलॉर्डी ‘द क्रिएचर’च्या भूमिकेत दिसतो. याशिवाय मिया गोथ आणि क्रिस्टोफ वॉल्ट्झ हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

किती ऑस्कर मिळाले?

फ्रँकनस्टाइन या चित्रपटाने अकॅडमी अवॉर्ड्स 2026 मध्ये एकूण 3 पुरस्कार जिंकले.बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइन,बेस्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग,बेस्ट प्रोडक्शन डिझाइन हे पुरस्कार या सिनेमाला मिळाले आहेत.हॉरर आणि थ्रिलरचा जबरदस्त अनुभव घ्यायचा असेल, तर ही फिल्म नक्की पाहा. 

हेही वाचा: 

Saumya tondon Dhurandhar 2: 'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंहच्या कानफाडात मारणाऱ्या अभिनेत्रीला सतावतेय रहमान डकैतची आठवण; म्हणाली...