Oscar Film OTT: हॉलिवूडपासून ते जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेणारा 98 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच डॉल्बी थिएटर येथे रंगला. या प्रतिष्ठित मंचावर यंदा एका चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला One Battle After Another. तब्बल 13 नामांकनं मिळवत या चित्रपटाने सहा मोठे पुरस्कार आपल्या नावावर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं.

Continues below advertisement

थिएटरमध्ये अपेक्षित यश न मिळालेल्या या सिनेमाने ऑस्करमध्ये बाजी मारल्यानंतर पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे आता OTT वर त्याची क्रेझ वाढताना दिसतेय.

OTT वर कुठे पाहाल?

ज्यांना थिएटरमध्ये हा सिनेमा पाहता आला नाही, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ हा चित्रपट आता JioHotstar वर स्ट्रीम होत आहे. 26 फेब्रुवारीपासून हा चित्रपट OTT वर उपलब्ध असून, प्रेक्षक त्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

Continues below advertisement

खिळवून ठेवणारं कथानक

हा सिनेमा फक्त अॅक्शन नाही, तर भावनिक जाणिवांचं उत्तम मिश्रण आहे. ही कथा आहे बॉब आणि त्याची मुलगी विला यांची. साधं आयुष्य जगणाऱ्या या दोघांच्या आयुष्यात अचानक वादळ येतं, जेव्हा 16 वर्षांनंतर बॉबचा जुना शत्रू परत येतो.

यानंतर मुलगी बेपत्ता होते आणि सुरू होतो एक धक्कादायक प्रवास रहस्य, अॅक्शन आणि भावना यांचा जबरदस्त संगम. प्रत्येक सीन तुम्हाला स्क्रीनला खिळवून ठेवतो.

स्टारकास्ट आणि दमदार दिग्दर्शन

या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती पॉल थॉमस अँडरसन यांनी केली आहे. चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो, शॉन पेन, बेनिसियो डेल टोरो, रेजिना हॉल, तेयाना टेलर आणि चेस इन्फिनिटी यांसारख्या स्टार्सची तगडी फौज आहे.

बॉक्स ऑफिसवर मध्यम, पण ऑस्करमध्ये सुपरहिट

सुमारे 1000 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर सुमारे 1600 कोटींची कमाई केली. तरीही अपेक्षेप्रमाणे ब्लॉकबस्टर न ठरलेला हा सिनेमा, ऑस्करमध्ये मात्र खऱ्या अर्थाने चमकला.

का पाहावा हा सिनेमा?

जर तुम्हाला अॅक्शनसोबत भावनिक ड्रामा, ट्विस्ट आणि दमदार परफॉर्मन्स पाहायला आवडत असतील, तर ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ हा सिनेमा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. ऑस्कर विजेता ठरल्यामुळे हा सिनेमा आता ‘मस्ट वॉच’ लिस्टमध्ये सामील झाला आहे.

हेही वाचा :

Bigg Boss नंतर 'या' शोमध्येही 'आपला माणूस' शिव ठाकरेचा दबदबा; विजेता ठरला पण 50 लाख गमावले, कारण काय?