Sunil Pal : प्रसिद्ध भारतीय कॉमेडियन, अभिनेता आणि व्हॉईस आर्टिस्ट सुनील पालचे गेल्या काही दिवसांत दोन ते तीन व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाले आहेत (Sunil Pal). या व्हिडीओमध्ये सुनील पालचे हावभाव, त्याची परिस्थिती, त्याचे कपडे यावरून त्याचे चाहते त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत, तर काही जण त्याने आधी केलेल्या ट्रोलींगचा दाखला देत त्याची खिल्ली उडवत आहेत, तर काहींनी सुनील पालच्या मित्रांनी त्याला मदत करावी, अशी भावना व्यक्त केली आहे, अशातच सुनील पालचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुप, या कंपनीच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेला दिसत होता. त्यावेळी तो हातात पॉपकॉर्नचा डब्बा घेऊन सेटवरतीच खाताना दिसतो आहे. त्याचवेळी त्याच्या समोर जावेद अख्तर येतात, तेव्हा सुनील पाल त्यांना वाकून नमस्कार करतो, हस्तांदोलन करतो, त्यानंतर दोघे एकमेकांशी काही वेळ बोलतात, नंतर जावेद अख्तर जातात.
या व्हिडीओमध्ये सुनील पाल एकदम साध्या कपड्यात, डोक्यावर टोपी, शर्ट आणि गॉगल घातलेला दिसतो आहे, एकदम शांत असा त्याचा चेहरा दिसतो, त्याच्या या व्हिडीओवरती त्याच्या चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. तर काहींनी पालची तुलना राजू श्रीवास्तवशी केलेली दिसत आहे. काही सोशल मिडीया सुजरनी पालवर टीका करत म्हटलंय की, जो माणूस सतत दुसऱ्यांचे पाय ओढण्यात गुंतलेला असतो, त्याला देव सर्वात आधी खाली आणतो.आता तो स्वतःच विनोदाचा विषय बनला आहे. मुनव्वरशी पंगा घेतला, करिअरच संपलं, सगळं कारण म्हणजे सगळ्यांशी असलेली त्याची उद्धट वृत्ती. खरं बोलला आहे, सरकारविरोधात बोलायला हिंमत लागते, अशाही काही कमेंट सुनील पालच्या व्हिडीओवरती आल्या आहेत.
video Viral: स्वस्तातला शर्ट, डोक्यावर टोपी अन् पायात स्लीपर, आधीही एक व्हिडीओ व्हायरल
सुनील पालने (Sunil Pal) किस किसको प्यार करूं 2 या कॅमेडी चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावली होती. त्यावेळीचा सुनील पालचा (Sunil Pal) एक व्हिडीओ सोशल मिडीयावर (Video Viral On social Media) व्हायरल झाल्याने चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, सुनील पालने एकदम साधा असा स्वस्तातला शर्ट घातलेला आहे, डोक्यावर टोपी आहे आणि पायात स्लीपर चप्पल घातलेली आहे, सुनील पालचा हा अवतार पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. त्याच्या या व्हिडीओखाली सोशल मिडीया युजरनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.(Video Viral On social Media)
काहींनी म्हटलं आहे की, सुनील पालकडे पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की, त्याची परिस्थिती फार वाईट सुरू आहे. यांची परिस्थिती पाहता हे खूप अडचणीत असल्याचं दिसतंय. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत करायला हवी. त्यानंतर काही युजरने म्हटलं आहे की, मदत तर सहकारी करतील, पण हा त्यांनाही टीका करून उलटसुलट काहीतरी बोलेल. अशा लोकांची कुणीही मदत करत नाही. याने कुणाशीही चांगले संबंध ठेवले नाहीत, सगळ्यांना शिवीगाळ करतो, स्वतःलाच देव समजू लागला आहे. अशा लोकांची अवस्था शेवटी अशीच होते, अशा कमेंट या व्हिडीओवरती आल्या आहेत. (Video Viral On social Media)
who is Sunil Pal? कोण आहे सुनील पाल?
सुनील पाल प्रसिद्ध भारतीय कॉमेडियन, अभिनेता आणि व्हॉईस आर्टिस्ट आहे. ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सीझनचा विजेता असून, तो मिमिक्री आणि स्टँड-अप कॉमेडीसाठी ओळखला जातो. त्यानी ‘हम तुम’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. सुनील पाल स्टेज शो आणि लाईव्ह परफॉर्मन्ससाठीही प्रसिद्ध आहेत. तसेच, डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या अपहरणाच्या प्रकरणामुळेही तो चांगलाच चर्चेत आला होता.