Director Death in Hotel: हॉटेलच्या खोलीत 4 दिवस मुक्काम, अचानक निधनाची बातमी, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं; नेमकं काय घडलं?
Odia Film Director S.K Murlidharan: 4 दिवस हॉटेलच्या खोलीत राहिले, अचानक निधनाची बातमी समोर; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृत्यू कसा झाला?

S.K Murlidharan Death in Hotel: ओडिया फिल्म इंडस्ट्रीतून (Odia Film Industry) एक दु:खद बातमी समोर येत आहे. चित्रपट दिग्दर्शक एस. के मुरलीधरन (S.K Murlidharan) यांचं अचानक निधन (Director Death) झालं आहे. त्यांचे पार्थिव कलिंगा विहार परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत सापडले आहे. ही माहिती समोर येताच ओडिया सिनेसृष्टीत (Film Industry) खळबळ उडाली. एस. के मुरलीधरन यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांसाठी काम केलं. हिट चित्रपटांचं (Entertainment) दिग्दर्शन केलंय. त्यांचं नाव सिनेइंडस्ट्रीत गाजलेलं होतं. पण त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने ओडिया सिनेसृष्टीत खळबळ उडवली. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात.
एस. के मुरलीधरन यांचं निधन, हॉटेलच्या खोलीत सापडला मृतदेह (Odia Film Director S.K Murlidharan Death in Hotel)
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच, भरतपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह रुग्णवाहिका देखील हॉटेलजवळ पोहोचली. एस. के मुरलीधरन यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी एस. के मुरलीधरन यांना तपासून मृत घोषित केले. आर. बापी साहू यांनी सांगितले की, 'एस. के मुरलीधरन यांची प्रकृती अचानक खालवली. त्यांना दृदयविकाराचा झटका आला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही', अशी माहिती त्यांनी दिली. माहितीनुसार, एस. के मुरलीधरन हे गेल्या चार दिवसांपासून घटकिया परिसरातील एका हॉटेलमध्ये राहिले होते.
एका फिल्मच्या संबंधित म्यूझिक आणि शूटिंगच्या कामासाठी ते हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती आहे. घटनेच्या एका दिवसापूर्वी त्यांची प्रकृती तंदुरुस्त होती. ते लोकांशी चर्चा करत होतो. आर. बापी साहू हे एस. के मुरलीधरन यांना सोमवारी दुपारच्या सुमारास भेटायलाही गेले होते. त्यावेळी सगळं काही सामान्य होतं. काही वेळानंतर एस. के मुरलीधरन यांची तब्येत बिघडली, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांना प्रचंड प्रमाणात घाम येऊ लागला होता. त्यांची प्रकृती खराब होत गेली. यानंतर त्यांना अचानक चक्कर आली. हॉटेलच्या खोलीत ते चक्कर येऊन पडले. प्रकरण गंभीर होताच, त्यांच्यासाठी तातडीने रुग्णवाहिका बोलवण्यात आली.
एस. के मुरलीधरन यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यानंतर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भरतपूर पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन तपास केला. एस. के मुरलीधरन यांची प्रकृती अचानक कशी ढासळली? हॉटेलच्या खोलीत कसे काय पडले? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. एस. के मुरलीधरन यांच्या संबंधित आणि जवळटच्या लोकांकडून जबाब नोंदवण्यात येत आहे. यापूर्वी एस. के मुरलीधरन हे कोणत्या आजाराने ग्रस्त किंवा टेन्शनमध्ये असल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या अचानक निधनानंतर सिनेसृष्टीसह त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















