Nysa Devgan at Fashion Event: नुकतंच झालेल्या अजिओ ल्यूक्स वीकेंडमध्ये (Ajio Luxe Weekend) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ( Bollywood Celebrities) हजेरी लावली आहे. त्यातच बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची ( Ajay Devgan) मुलगी न्यासा देवगन ( Nyasa Devgan) कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरली. या कार्यक्रमातील तिचा स्टनिंग लूक चांगलाच व्हायरल होत आहे. 


फॅशन शो नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटीजसाठी आवडीचा इव्हेंट ठरतो. अनेक सेलिब्रिटी त्यात सहभागी होताना दिसतात. त्यांची फॅशन आणि त्यांचा मेकअप लूक नेहमीच आकर्षिक करतो. अजिओ ल्यूक्स वीकेंड हा फॅशन इव्हेंट जिओ वर्ल्ड गार्डन (बीकेसी) येथे 3,4, आणि 5 फेब्रुवारी रोजी पार पडला. अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांची लाडकी मुलगी न्यासा देवगन आपल्या ग्लॅमरस लूक्स आणि अपग्रेडेड स्टाईलमुळे चर्चेचा विषय ठरते. सध्या तिची सोशल मीडियावर खूपच हवा होतं आहे.


बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधी तिने तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. ती नेहमीच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर फिरताना आढळते. नुकत्याच झालेल्या अजिओ ल्यूक्स वीकेंड या फॅशन इव्हेंटला न्यासाने अर्जुन रामपालची (Arjun Rampal) मुलगी माहिका रामपाल (Mahika Rampal)आणि ओरे म्हणजेच ओरहान अवतरमानी (Orhan Awatramani) यांच्याबरोबर हजेरी लावली.


या फॅशन इव्हेंटमधले न्यासा देवगनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसते आहे. न्यासा ही अभिनेता अर्जुन रामपालची लेक माहिका रामपाल आणि ओरहान अवतरमानी यांच्यासोबत दिसते आहे. 


न्यासाचा ग्लॅमरस लूक :  Glamorous Looks of Nyasa Devgan 


या इव्हेंटला न्यासाने सुंदर लाल रंगाचा वन पीस ड्रेस घातला आहे. तिच्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या हॉट लूकची चर्चा  सर्वत्र होत असतानाच तिच्या चाहत्यांनीही सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षांव केला आहे.


Bollywood Celebrities attended the Event: या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली 


फॅशन इव्हेंट्समध्ये अनेक मोठमोठे बॉलिवुड सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. आतादेखील अजिओ ल्यूक्स वीकेंडमध्ये न्यासा देवगनसोबतच ऋतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुजॅन खान (Sussanne Khan),ऋतिक रोशन (Hrithik Roshan), फेमस अॅक्ट्रेस श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), शनाया कपूर (Shanaya Kapoor), शाहीद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मिरा कपूरदेखील (Mira Kapoor) उपस्थित होते. मानव मंगलानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सर्व सेलेब्सचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. या फोटो आणि व्हिडीओला चाहत्यांनी भरभरून लाईक केलं असून कमेंट्सही केल्या आहेत.


ही बातमी वाचा: