Nushrratt Bharuccha Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bengaluru) आयपीएल 2026 ची ट्रॉफी उंचावल्यानंतर देशभरात एकच जल्लोष झाला. अनेकांनी आरसीबीच्या जल्लोषात सहभागी होत सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या. कित्येकांनी स्टोरी, स्टेटस अपलोड केलं. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनीही स्टोरी ठेवून आरसीबीचं विजयी झाल्याबद्दल कौतुक केलंय. पण, हीच स्टोरी ठेवणं एका बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) महागात पडलंय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अभिनेत्रीच्या स्टोरीच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
आम्ही ज्या अभिनेत्रीच्या सोशल मीडियावरच्या स्टोरीबाबत बोलतोय, तिचं नाव नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha). सोशल मीडियावरील काही युजर्सचा दावा आहे की, आरसीबी (RCB) जिंकल्यानंतर नुसरतनं शेअर केलेल्या एका व्हिडीओ स्टोरीच्या बॅकग्राउंडला काही आक्षेपार्ह आवाज ऐकू येत आहेत. त्यानंतर या कथित व्हिडीओची क्लिप वेगानं व्हायरल झाली आणि यावर विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. मात्र, हा व्हिडीओ खरोखर नुसरत भरुचा हिनंच शेअर केलाय का? सोशल मीडियावर व्हायरल होणारी स्क्रिन रेकॉर्डिंग नुसरतीचीच आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच, त्या व्हिडीओत ब्रॅकग्राउंडला येणाऱ्या आवाजांबाबत केला जाणारा दावा कितपत खरा आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता संशयाच्या भोवऱ्यात असून, सोशल मीडियावर याबाबत मतमतांतरं दिसून येत आहेत. काही जण व्हायरल दाव्यांवर विश्वास ठेवत असताना, तर अनेकांनी कोणतीही पडताळणी न करता निष्कर्ष काढू नयेत, अशी भूमिका घेतली आहे.
नेमकं घडलंय काय?
RCB च्या विजयानंतर नुसरत भरुचाची 'स्टोरी' सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 31 मे रोजी आयपीएल 2026 चा अंतिम सामना खेळवण्यात आला. आरसीबी जिंकल्यानंतर नुसरत भरूचानं एक स्टोरी पोस्ट केली. आरसीबीचं विजयानंतरचं सेलिब्रेशन सुरू होतं आणि त्याचा व्हिडीओ नुसरतनं स्टोरीला शेअर केलेला. युजर्सच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्री नुसरत भरुचानं तिच्या टीव्ही स्क्रीनचा एक छोटा व्हिडीओ शेअर केलेला, ज्यामध्ये विजयाचा ऐतिहासिक क्षण आणि आतीषबाजी पाहायला मिळाली. पण, तिनं शेअर केलेल्या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला युजर्सनी काही आक्षेपार्ह्य आवाज ऐकल्याचा दावा केला आणि खळबळ माजली. युजर्सकडून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी या व्हिडीओ क्लिपमुळे सोशल मीडियावर नुसरत भरूचाला जोरदार ट्रोल केलं जात आहे. तसेच, स्टोरी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नुसरतनं ही स्टोरी डिलीट केल्याचंही बोललं जातंय.
सत्य नेमकं काय? Viral होणारी पोस्ट नुसरतनंच केलेली?
अभिनेत्री नुसरत भरुचा यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांची पडताळणी केली असता, त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून असा कोणताही व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचा ठोस किंवा अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. इंटरनेटवर केले जाणारे दावे मुख्यतः ट्विटर आणि रेडिटवरील स्क्रीनशॉट्स आणि स्क्रीन रेकॉर्डिंग्जवर आधारित आहेत. केवळ स्क्रीन रेकॉर्डिंग किंवा स्क्रीनशॉटच्या आधारे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य ठरत नाही. सध्याच्या डिजिटल युगात व्हिडीओ आणि ऑडिओ एडिट करणं अत्यंत सोपं झालं आहे. मूळ व्हिडीओमधील आवाज बदलणं किंवा त्यावर स्वतंत्र ऑडिओ जोडणं तांत्रिकदृष्ट्या सहज शक्य आहे. त्यामुळे कोणताही ठोस पुरावा उपलब्ध होईपर्यंत या व्हायरल दाव्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा सावध भूमिका घेणं आवश्यक आहे. ABP माझा या व्हायरल व्हिडीओचं, पोस्टचं समर्थन करत नाही. तसेच, अभिनेत्रीनंही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP माझाच्या बातम्या LIVE...
