Nushrratt Bharuccha Health Update: नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल; ऑक्सिजन सपोर्टवर दिसली, चाहत्यांची चिंता वाढली VIDEO
Nushrratt Bharuccha Health Update: बालीमध्ये झालेल्या एका अपघातानंतर नुसरत भरुचा मुंबईला परतलीय. सोशल मीडियावर तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आलेत, ज्यामध्ये तिची प्रकृती गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय.

Nushrratt Bharuccha Health Update: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री नुसरत भरूचा (Actress Nushrratt Bharuccha) हिचा बालीमध्ये (Bali) भीषण अपघात (Nushrratt Bharuccha Accident In Bali) झालाय. या अपघातात नुसरतच्या पाठीच्या (Nushrratt Bharuccha) कण्याला गंभीर दुखापत झालीय. पाठीच्या कण्यावरच्या शस्त्रक्रियेसाठी नुसरतला तातडीनं बालीहून एअर अॅम्बुलन्सनं शस्त्रक्रियेसाठी बालीहून मुंबईला (Mumbai News) आणण्यात आलं. सध्या सोशल मीडियावर नुसरत भरूचाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती ऑक्सिजन सपोर्टवर दिसतेय. तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये नुसरतला दुखापतीमुळे होणारा त्रास स्पष्ट दिसतोय.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचाला एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात आलंय. ती एका प्रोजेक्टच्या कामासाठी बालीला गेलेली आणि काम संपल्यानंतर तिथेच तिनं व्हेकेशन एन्जॉय केलेलं. पण, तिथेच तिचा भीषण अपघात झाला आणि याच अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालंय आणि तिला सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर तिला एअरलिफ्ट करुन मुंबईत आणण्यात आलं, जिथे तिच्या पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.
नसरत भरुचा ऑक्सिजन सपोर्टवर (Nushrratt Bharuccha On Oxygen Support Video Viral)
एअर अॅम्ब्लुलन्सनं मुंबईत आल्यानंतरचा अभिनेत्री नुसरत भरूचाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये नुसरतला स्ट्रेचरवरुन आणलं जात असल्याचं दिसतंय. नुसरत शुद्धीवर असून ती आसपास असलेल्यांशी काहीतरी बोलताना दिसतेय. व्हिडीओमध्ये नुसरत ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचं पाहायला मिळतंय. तिची प्रकृती तशी नाजूक असल्याचंच दिसतंय. तिला स्ट्रेचरवरुन आणण्यात आलंय.
View this post on Instagram
नुसरत भरूचा हिला दुखापत कशी झाली?
यापूर्वी, नुसरत भरूचाच्या टीमनं तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. दुखापत आणि त्यानंतर होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना विश्रांती आणि बरं होण्यासाठी वेळ लागेल, असं सांगण्यात आलं होतं. याचा परिणाम त्यांच्या आगामी कामांवर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावेळी त्यांना नेमकी दुखापत कशामुळे झाली? याचा तपशील उघड करण्यात आला नव्हता. पुढील उपचारांसाठी नुसरत आता मुंबईत दाखल झाली आहे, तरीही तिच्या मणक्याची शस्त्रक्रिया कधी होणार? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
नुसरत भरूचाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर, नुसरत भरूचा टायगर श्रॉफसोबत एका प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची ही तिची पहिलीच वेळ ठरलीय, पण त्याआधीच ही मोठी घटना घडली. दरम्यान, या सिनेमाचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. ती शेवटची 'उफ ये सियापा' (Uff Yeh Siyapa) या कॉमेडी-ड्रामा सिनेमात दिसली होती, जो 5 सप्टेंबर 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















